Mumbai news : लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी ५ ते ६ किमी रांग; देशभरातून भाविक मुंबईत दाखल
Mumbai news : मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने विविध शहरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
1 मिनट पठन

Mumbai news : मुंबई : राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असून ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने विविध शहरांमध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. मुंबईतील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेला लालबागचा राजाच्या दर्शनासाठी यंदाही भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. दर्शनासाठी लागलेली रांग तब्बल ५ ते ६ किलोमीटरपर्यंत पोहोचल्याचे चित्र असून, पहाटेपासून गर्दीत सातत्याने वाढ होत आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
‘नवसाला पावणारा गणपती’ अशी लालबागच्या राजाची ख्याती असल्याने दरवर्षी देशाच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात. यंदाही कालपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या असून, बाप्पाच्या मुखदर्शनासाठी भक्त मोठ्या उत्साहाने तासन्तास प्रतीक्षा करत आहेत. ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
देशभरातून भाविक मुंबईत
लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल आणि देशातील इतर भागांतूनही भाविक मुंबईत दाखल झाले आहेत. काही भाविक नवस करण्यासाठी, तर काही केलेला नवस फेडण्यासाठी बाप्पाच्या चरणी येत आहेत.
लालबागच्या राजाच्या चरणी दरवर्षी मोठ्या प्रमाणात रोख रक्कम, तसेच सोन्या-चांदीचे दागिने अर्पण केले जातात. त्यामुळे दर्शनासोबतच नवस आणि श्रद्धेची परंपराही या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरते.
‘शिव शंकर’ थीमवर भव्य देखावा
यंदा लालबागच्या राजाचे ९३ वे वर्ष असून, मंडळाच्या वतीने ‘शिव शंकर’ या संकल्पनेवर आधारित आकर्षक देखावा साकारण्यात आला आहे. हा देखावा भाविकांचे विशेष आकर्षण ठरत असून, बाप्पाच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांमध्ये त्याची मोठी चर्चा आहे.
लालबागच्या राजासह इतर गणेश मंडळांकडेही गर्दी
लालबागच्या राजाचे दर्शन घेतल्यानंतर अनेक भाविक मुंबईतील इतर प्रसिद्ध गणेश मंडळांनाही भेट देत आहेत. लालबागचा राजा, मुंबईचा राजा आणि चिंचपोकळीचा चिंतामणी या प्रमुख गणेश मंडळांना गणेशोत्सवात विशेष महत्त्व आहे.
या प्रमुख मंडळांच्या परिसरात भाविकांची मोठी गर्दी होत असून, भक्ती, उत्साह आणि ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषाने संपूर्ण मुंबई गणेशमय झाली आहे. गर्दी लक्षात घेता भाविकांच्या सोयीसाठी मंडळांकडून विविध सुविधा आणि व्यवस्थाही करण्यात आल्या आहेत.
