karad News : कोयना धरणात १०५.०३ टीएमसी पाणीसाठा
karad News कराड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले असून, धरणात सध्या १०५.०३ टीएमसी पाणीसाठा आहे.
1 मिनट पठन

Karad News : पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्युसेक विसर्ग सुरू
karad News कराड : महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखले जाणारे कोयना धरण पूर्ण क्षमतेने १०० टक्के भरले असून, धरणात सध्या १०५.०३ टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी काही दिवसांपासून धरणाचे दरवाजे उघडून कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.https://maharashtramirror.com/ karad News
धरणाचे दरवाजे एक फूट उघडून त्यातून ३ हजार १८२ क्युसेक, तर पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्युसेक असा एकूण ४ हजार २३२ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू होता.
मात्र, शुक्रवारी सकाळी धरणाच्या दरवाजातून नदीपात्रात करण्यात येणारा पाण्याचा विसर्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे आता धरणाच्या दरवाजातून होणारा विसर्ग थांबला असून, पायथा वीजगृहातून १ हजार ५० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.https://maharashtramirror.com/ karad News
कोयना धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असल्याने धरणातील पाणीसाठा आणि पाणीपातळीवर प्रशासनाकडून सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. पावसाचा जोर आणि धरणातील आवक यानुसार पुढील काळात विसर्गाबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
