मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : कोथरूडमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यातील टोळीचा पर्दाफाश

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील फ्लॅट फोडून ७ लाख ७ हजार ३६० रुपये किमतीची कॉपर वायर चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

कोथरूडमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यातील टोळीचा पर्दाफाश दोन आरोपींना २४ तासात अटक; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त
कोथरूडमध्ये घरफोडी करणाऱ्या आंतरराज्यातील टोळीचा पर्दाफाश दोन आरोपींना २४ तासात अटक; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime : दोन आरोपींना २४ तासात अटक; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune Crime :पुणे, महाराष्ट्र मिरर : कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरात नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीतील फ्लॅट फोडून ७ लाख ७ हजार ३६० रुपये किमतीची कॉपर वायर चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन आरोपींना कोथरूड पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. त्यांच्याकडून चोरीस गेलेली संपूर्ण कॉपर वायर जप्त करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी २५ ऑक्टोबर २०२६ रोजी कोथरूड पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०५(५), ३३१(३) आणि ३३१(४) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. नवीन बांधकामाच्या ठिकाणाहून फ्लॅट फोडून कॉपर वायर चोरीला गेल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला.https://maharashtramirror.com/ Pune News
कोथरूड पोलिस ठाण्याचे चौकी अंमलदार योगेश सुळ यांना गोपनीय बातमीदारामार्फत चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन दोन संशयित डुक्कर खिंड सर्व्हिस रोड परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण यांना दिली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके यांच्या सूचनेनुसार पथकाने संबंधित ठिकाणी जाऊन दोघांना ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान त्यांनी अहमद रजा इसरार अहमद खान (वय २२) आणि फैय्याज मेराज शहा (वय २०) (दोघेही रा. तुलसीपूर तालुका, बलरामपूर जिल्हा, उत्तर प्रदेश) अशी नावे सांगितली. त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या गोणीमध्ये कॉपर वायर आढळली. ही वायर कोथरूडमधील उजवी भुसारी कॉलनी परिसरातील नवीन बांधकामाच्या ठिकाणाहून चोरी केल्याचे त्यांनी सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर दोघांना गुन्ह्यात अटक करून ७ लाख ७ हजार ३६० रुपये किमतीची कॉपर वायर जप्त करण्यात आली.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण करीत आहेत.
ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, परिमंडळ तीनचे पोलिस उपायुक्त डॉ. सागर कवडे आणि कोथरूड विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सुजाता तानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरुण घोडके, पोलिस निरीक्षक (गुन्हे) अनिल माने, पोलिस निरीक्षक सुनील कारोटे, सहायक पोलिस निरीक्षक संदीप घुले, पोलिस उपनिरीक्षक मोहन चव्हाण तसेच पोलिस अंमलदार योगेश सुळ, गौतम पवार, विशाल मंडले, अजय पवार, प्रदीप जवादे, सूरज कदम आणि उमेश राऊत यांनी कारवाईत सहभाग घेतला.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें