मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : बांधकाम व्यावसायिक अमोल रावेतकर, समीर बेलवलकर यांच्यावर गंभीर आरोप

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोरेगाव पार्क येथील द न्यू लक्ष्मीनारायण पार्क को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या प्रस्तावित पुनर्विकासावरून आता वाद निर्माण झाला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

2 मिनट पठन

बांधकाम व्यावसायिक अमोल रावेतकर, समीर बेलवलकर यांच्यावर गंभीर आरोप पुनर्विकासाच्या निविदेवरून वाद: न्यायालयाकडे कायमस्वरूपी मनाई आदेशासह ३ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी
बांधकाम व्यावसायिक अमोल रावेतकर, समीर बेलवलकर यांच्यावर गंभीर आरोप पुनर्विकासाच्या निविदेवरून वाद: न्यायालयाकडे कायमस्वरूपी मनाई आदेशासह ३ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी

Pune News : पुनर्विकासाच्या निविदेवरून वाद: न्यायालयाकडे कायमस्वरूपी मनाई आदेशासह ३ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : कोरेगाव पार्क येथील द न्यू लक्ष्मीनारायण पार्क को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीच्या प्रस्तावित पुनर्विकासावरून आता वाद निर्माण झाला आहे. या पुनर्विकासाच्या निविदा प्रक्रियेत रावेतकर ग्रुप आणि बेलवलकर ग्रुपने संगनमत केल्याचा आरोप सोसायटीकडून करण्यात आला असून, याप्रकरणी पुणे दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

३ कोटींच्या नुकसान भरपाईची मागणी


या प्रकरणात अमोल रावेतकर यांच्या रावेतकर ग्रुप आणि समीर बेलवलकर यांच्या बेलवलकर ग्रुपवर निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न पाळल्याचा आणि सोसायटीची फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सोसायटीने न्यायालयाकडे कायमस्वरूपी मनाई आदेशासह ३ कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे. https://maharashtramirror.com/ Pune News

पुनर्विकासासाठी झालेल्या निविदा प्रक्रियेत दोन्ही ग्रुपने सुरुवातीला स्वतंत्रपणे सहभाग घेतला होता. मात्र, त्यानंतर दोन्ही ग्रुपकडून संयुक्तपणे सादरीकरण करण्यात आल्याचा दावा सोसायटीने केला आहे. ७ डिसेंबर २०२५ रोजी दोन्ही कंपन्यांनी संयुक्तपणे प्रेझेंटेशन केल्याचेही दाव्यात नमूद करण्यात आले आहे.

विकासकांकडून देण्यात आलेल्या ऑफरमध्येही बदल


याच मुद्द्यावरून आता निविदा प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत. दोन्ही ग्रुप स्वतंत्र निविदाकार म्हणून सहभागी झाले असताना त्यांनी संयुक्तपणे सादरीकरण का केले? तसेच या संयुक्त सादरीकरणासाठी आवश्यक अधिकृत करार किंवा कागदपत्रे होती का? याबाबतही सोसायटीने आक्षेप घेतला आहे. दरम्यान, या प्रक्रियेत विकासकांकडून देण्यात आलेल्या ऑफरमध्येही बदल झाल्याचे समोर आले आहे. सुरुवातीला १०२ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाची ऑफर देण्यात आली होती. चर्चेनंतर ती १०६ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आली. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपने १११ टक्के अतिरिक्त क्षेत्रफळाची ऑफर दिली. यानंतर बेलवलकर-रावेतकर ग्रुपने पुन्हा आपली ऑफर बदलून ११० टक्के अतिरिक्त क्षेत्रफळ आणि एक कार पार्किंग देण्याची तयारी दर्शवली.

मात्र, केवळ ऑफरमध्ये बदल झाला म्हणून फसवणूक झाली असे सिद्ध होत नाही. सोसायटीचा मुख्य आक्षेप हा निविदा प्रक्रियेत दोन्ही ग्रुपमध्ये संगनमत झाले का आणि त्यामुळे निविदा प्रक्रिया प्रभावित झाली का, यावर आहे.आता या आरोपांवर संबंधित रावेतकर आणि बेलवलकर ग्रुपची भूमिका काय आहे आणि न्यायालयीन प्रक्रियेत या आरोपांबाबत काय निष्पन्न होते, हे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्वाचे मुद्दे

  • कोरेगाव पार्क येथील द न्यू लक्ष्मीनारायण पार्क को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीचा प्रस्तावित पुनर्विकास
  • रावेतकर ग्रुप आणि बेलवलकर ग्रुपने संगनमत केल्याचा आरोपावरून सोसायटीने पुणे दिवाणी न्यायालयात केला दावा दाखल
  • अमोल रावेतकर आणि समीर बेलवलकर यांच्यावर निविदा प्रक्रियेत पारदर्शकता न पाळल्याचा आणि सोसायटीची फसवणूक केल्याचा आरोप
  • निविदा प्रक्रियेत दोन्ही ग्रुपने सुरुवातीला स्वतंत्रपणे सहभाग घेतला होता. मात्र, त्यानंतर दोन्ही ग्रुपकडून संयुक्तपणे सादरीकरण करण्यात आल्याचा दावा
  • ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/



    शेयर करें