Pune News : कोंढव्यात साडेबारा लाखांचा गुटखा जप्त
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: विक्रीसाठी टेम्पोतून आणण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली.
2 मिनट पठन

Pune News : टेम्पोतून प्रतिबंधित पानमसाला-तंबाखूची वाहतूक; दोघांना अटक, पुरवठादार दोघांचा पोलिसांकडून शोध
Pune News पुणे, महाराष्ट्र मिरर: विक्रीसाठी टेम्पोतून आणण्यात आलेल्या प्रतिबंधित गुटख्याच्या साठ्यावर कोंढवा पोलिसांनी कारवाई केली. साईबाबानगर परिसरात केलेल्या या कारवाईत ६ लाख ७८ हजार ८४ रुपयांचा पानमसाला व तंबाखू जप्त करण्यात आला. यासह टेम्पो, दोन मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण १२ लाख ४० हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, गुटखा पुरविणाऱ्या आणखी दोघांचा शोध सुरू आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
कोंढवा पोलिस ठाण्याचे तपास पथक गुरुवारी (दि. ४) हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी पोलिस हवालदार अमोल हिरवे यांना गोपनीय बातमीदारामार्फत एमएच १२ व्हीटी २९७९ क्रमांकाच्या टेम्पोतून गुटखा विक्रीसाठी साईबाबानगर परिसरात आणला जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने परिसरात शोध घेतला.https://maharashtramirror.com/ Pune News
साईबाबानगर येथील शालीमार हिल पार्क सोसायटीजवळील सार्वजनिक रस्त्यावर पोलिसांना संबंधित टेम्पो आढळून आला. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला विमल पान मसाला, व्ही-वन बिग तंबाखू आणि व्ही-वन तंबाखू असा साठा आढळल्याचे पोलिसांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी लवकुश विमलेश यादव (वय २६, रा. झोपडेनगर, कात्रज, पुणे; मूळ रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) आणि त्याचा साथीदार गुड्डू कैलाश गौतम (वय २९, रा. झोपडेनगर, कात्रज, पुणे; मूळ रा. रायबरेली, उत्तर प्रदेश) यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीत हा गुटखा सागर लुनिया आणि दिनेश लुनिया, रा. झोपडेनगर, कात्रज यांच्याकडून आणल्याचे निष्पन्न झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
टेम्पोसह १२.४० लाखांचा मुद्देमाल
पोलिसांनी आरोपींकडून ६ लाख ७८ हजार ८४ रुपयांचा प्रतिबंधित पानमसाला व तंबाखू, १२ हजार ५०० रुपये रोख, ३० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल आणि ५ लाख २० हजार रुपये किमतीचा टेम्पो असा एकूण १२ लाख ४० हजार ५८४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.https://maharashtramirror.com/ Pune News
याप्रकरणी कोंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ६८८/२०२६ नोंदविण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने आणि अन्न सुरक्षा मानके कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोघांची पोलिस कोठडी घेण्यात आली असून सागर लुनिया आणि दिनेश लुनिया यांचा शोध सुरू आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे करीत आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांच्यासह कोंढवा पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने ही कारवाई केली
