Pune News : कोंढापुरीत धारदार हत्याराने वार करून तरुणाचा खून
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढापुरी (ता.
1 मिनट पठन

Pune News : शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, खुनाचे कारण अस्पष्ट
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : कोंढापुरी (ता. शिरूर) येथील खंडोबा मंदिराजवळ धारदार हत्याराने वार करून २४ वर्षीय तरुणाचा खून केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र लव सकट (रा. रांजणगाव गणपती) असे मृत तरुणाचे नाव असून, त्याच्या वडिलांनी तीन मित्रांवर संशय व्यक्त केला आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी लव विष्णू सकट (वय ५८, रा. रांजणगाव गणपती, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून शिक्रापूर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून, प्रथमेश राऊत (रा. ढोकसांगवी), शुभम घुले (रा. रांजणगाव गणपती) आणि ओम खंडागळे यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, १९ ऑक्टोबर रोजी रात्री साडेनऊ ते २० ऑक्टोबर रोजी सकाळी दहा या कालावधीत ही घटना घडली. महेंद्रच्या डोक्यावर, मानेवर, तोंडावर आणि पाठीवर धारदार हत्याराने वार करण्यात आले. अज्ञात कारणावरून त्याच्या तीन मित्रांनी हे वार करून खून केला असावा, असा संशय वडिलांनी फिर्यादीत व्यक्त केला आहे. या प्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक हणमंतराव तपास करीत आहेत.
