मुख्य सामग्री पर जाएँ

Kohlapur News : ऊसदरासाठी कोगनोळीत शेतकऱ्यांचा एल्गार; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

Kohlapur News : कोल्हापूर: ऊस दरवाढीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर पुकारलेल्या बेमुदत महामार्ग रोको आंदोलनाला २४ तास होत आले तरी आंदोलन सुरूच आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

ऊसदरासाठी कोगनोळीत शेतकऱ्यांचा एल्गार; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प
ऊसदरासाठी कोगनोळीत शेतकऱ्यांचा एल्गार; पुणे-बंगळुरू महामार्ग ठप्प

Kohlapur News : हजारो ट्रक-कंटेनर अडकले, भाजीपाला ४० टक्क्यांपर्यंत महागला

Kohlapur News : कोल्हापूर: ऊस दरवाढीसह विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील कोगनोळी टोलनाक्यावर पुकारलेल्या बेमुदत महामार्ग रोको आंदोलनाला २४ तास होत आले तरी आंदोलन सुरूच आहे. त्यामुळे पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून हजारो ट्रक आणि कंटेनर अडकून पडले आहेत. आंदोलनाची झळ आता कोल्हापूरच्या भाजीपाला बाजारालाही बसली असून काही भाज्यांचे दर ३० ते ४० टक्क्यांपर्यंत वाढले आहेत.https://maharashtramirror.com/ Kohlapur News
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली कोगनोळी टोलनाक्यावर आंदोलन सुरू आहे. महामार्गावरील वाहतूक ठप्प झाल्यामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांतील मालवाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. कोल्हापुरातील लक्ष्मी टेकडी आणि फाईव्ह स्टार एमआयडीसी परिसरात मोठ्या संख्येने ट्रक आणि कंटेनर अडकून पडले आहेत. विविध राज्यांत माल घेऊन जाणारी वाहने पुढे जाऊ शकत नसल्याने चालक आणि क्लीनर यांचीही गैरसोय होत आहे. दीर्घकाळ वाहने एकाच ठिकाणी थांबल्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.https://maharashtramirror.com/ Kohlapur News

भाजीपाल्याची आवक घटली


कोल्हापूरच्या बाजारात बेळगाव, गटप्रभा आणि परिसरातून मोठ्या प्रमाणावर भाजीपाला येतो. मात्र, सीमेवर भाजीपाला आणि नाशवंत मालाची वाहने अडकल्याने बाजारातील आवक घटली आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. भेंडी ८० रुपयांवरून १०० रुपये, ढबू मिरची ७० वरून ८० रुपये, गाजर ६५ वरून ८० रुपये, तर वांगी ८५ वरून १०० रुपये किलो झाली आहेत. वाटाणा १८० वरून २०० रुपये, बीन्स ९० वरून १०० रुपये आणि हिरवी मिरची ७० वरून ८० रुपये किलो झाली आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें