Pimpri News : खेड येथे रस्त्यावरून पिकअप गाडीची चोरी
Pimpri News :पिंपरी: रस्त्याच्या कडेला पार्क केलेली मालवाहतूक पिकअप गाडी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली.
1 मिनट पठन

Pimpri News :पिंपरी: रस्त्याच्या कडेला पार्क केलेली मालवाहतूक पिकअप गाडी अज्ञात चोरट्याने लांबवल्याची घटना घडली. ही घटना रविवारी (११ ऑक्टोबर) दुपारी तीन वाजताच्या सुमारास कुरूळी गावचे हद्दित, खेड येथे घडली.https://maharashtramirror.com/ Pimpri News
सुनिल जनार्धन सोमटकर (५०, रा. भोसरी) यांनी याप्रकरणी दक्षिण महाळुंगे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपली ४ लाख ५० हजार रुपये किमतीची पिकअप गाडी (एमएच 14 एलबी 6283) रस्त्यावर लावली होती. ती गाडी अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी फिर्यादीच्या संमतीशिवाय चोरून नेली. दक्षिण महाळुंगे पोलीस तपास करीत आहेत.
