Pune News : राष्ट्रवादीकडून महापौरांना 'प्युरिफायर' गिफ्ट;खडकवासला धरणात दूषित सांडपाणी मिश्रणाचा मुद्दा पेटला
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : खडकवासला धरणात दूषित सांडपाणीमिश्रणाचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या मुख्य सभेत चांगलचा गाजला.
1 मिनट पठन

Pune News : प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर तीव्र संताप
Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर :खडकवासला धरणात दूषित सांडपाणीमिश्रणाचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या मुख्य सभेत चांगलचा गाजला. गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरणात हॉटेल, रेस्टॉरंटचे सांडपाणी मिसळल्याचे धक्कादायक व्हिडीओ समोर येत आहेत त्यामुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. दरम्यान, आज मुख्यसभेत राष्ट्रवादीकडून महापौर मंजुषा नागपुरे तसेच आयुक्त नवल किशोर राम यांना प्युरिफायर गिफ्ट देत अनोखे आंदोलन केले.https://maharashtramirror.com/ Pune News
दूषित पाणीपुरवठ्याकडे वेधले लक्ष
शहराला शुद्ध आणि सुरक्षित पाणी पुरवणे ही प्रशासनाची मुख्य जबाबदारी आहे. मात्र, प्रत्यक्षात धरणाच्या जलस्रोतांमध्येच मैला आणि सांडपाणी मिसळत असल्याने पिण्याच्या पाण्याच्या शुद्धतेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या गंभीर प्रकरणाकडे प्रशासनाचे तत्काळ लक्ष वेधण्यासाठी विरोधी पक्षाच्या वतीने महापालिका सभेत थेट ‘वॉटर प्युरिफायर’ भेट देण्यात आले. प्रशासनाला गांभीर्याने कारवाई करायला लावण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आल्याचे स्पष्ट करत, केवळ कागदी घोडे न नाचवता तातडीने कृती करण्याची आक्रमक मागणी करण्यात आली.
खडकवासला धरण परिसरातील गोरे बुद्रुक, गोरे खुर्द, सिंहगड पायथा, खानापूर, मांडवी आणि कुडजे आदी गावांमधील काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि व्यावसायिक आस्थापनांकडून प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट धरमाच्या जलस्रोतांमध्ये सोडले जात असल्याचा गंभीर मुद्दा यावेळी उपस्थित करण्यात आला.
मुख्य सभेदरम्यान, खडकवासला धरणात मिसळणाऱ्या दूषित सांडपाण्याचा स्रोत तातडीने शोधून तो बंद करावा. पिण्याच्या पाण्याची नियमित तपासणी करून नागरिकांना शुद्ध पाण्याची खात्री द्यावी. दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होणार नाही, यासाठी तातडीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. दोषींवर नियमानुसार कठोर कारवाई करून भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही, याची दक्षता घ्यावी. पुणेकरांना आश्वासनं नकोत, शुद्ध पाणी हवं! नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या प्रश्नावर प्रशासनाने केवळ आश्वासनांपुरते मर्यादित न राहता तातडीने कृती करावी. अशी मागणी यावेळी राष्ट्रवादीकडून करण्यात आली आहे.
