मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : कात्रज-कोंढवा रस्ता प्रश्नी मुख्यसभेत गदारोळ

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या आज झालेल्या मुख्य सभेत कात्रज–कोंढवा रस्त्यावरील वाढते अपघात आणि रस्ता रुंदीकरणाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा गाजला.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

कात्रज-कोंढवा रस्ता प्रश्नी मुख्यसभेत गदारोळ; माजी महापौर दत्ता धनकवडेंना डावलल्याने संताप
कात्रज-कोंढवा रस्ता प्रश्नी मुख्यसभेत गदारोळ; माजी महापौर दत्ता धनकवडेंना डावलल्याने संताप

Pune News : माजी महापौर दत्ता धनकवडेंना डावलल्याने संताप

पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे महानगरपालिकेच्या आज झालेल्या मुख्य सभेत कात्रज–कोंढवा रस्त्यावरील वाढते अपघात आणि रस्ता रुंदीकरणाच्या रखडलेल्या कामाचा मुद्दा गाजला. मात्र, या अत्यंत संवेदनशील विषयावर स्थानिक नागरिकांची बाजू मांडण्यासाठी उभे राहिलेले माजी महापौर दत्ता धनकवडे यांना बोलण्याची पुरेशी संधी न मिळाल्यामुळे सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

कात्रज–कोंढवा रस्त्यावर गेल्या काही वर्षांत झालेल्या अपघातांमध्ये अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रस्त्याची अपूर्ण कामे, धोकादायक वळणे, सुरक्षेच्या अपुऱ्या उपाययोजना आणि प्रचंड वाहतूक कोंडी यांमुळे या मार्गावरील प्रवास अत्यंत धोकादायक बनला आहे. या गंभीर प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारण्यासाठी आणि तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यासाठी माजी महापौर दत्ता धनकवडे सभागृहात आक्रमकपणे उभे राहिले होते.https://maharashtramirror.com/ Pune News

परंतु, धनकवडे आपला मुद्दा मांडत असताना त्यांना वारंवार रोखण्यात आले आणि आपली भूमिका पूर्णपणे मांडण्यापासून डावलल्याचे दिसून आले. स्थानिक प्रश्नांची सखोल माहिती असणाऱ्या आणि थेट नागरिकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी महापौरांनाच मुख्य सभेत बोलू न दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नागरिकांच्या जिव्हाळ्याच्या आणि सुरक्षिततेच्या प्रश्नावर लोकप्रतिनिधींचाच आवाज दाबला जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांना न्याय कसा मिळणार, असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, मुख्य सभेत या मुद्द्यावर इतर सदस्यांनीही तीव्र संताप व्यक्त केला. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने केवळ आश्वासने न देता ठोस आणि वेळेत पूर्ण होणाऱ्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे. मात्र, या सर्व घडामोडींमध्ये एका प्रमुख स्थानिक नेत्याला आणि माजी महपाौरांनाच सभागृहात बोलण्यापासून रोखल्या गेल्याच्या प्रकरणाची चर्चा आता शहरात सर्वत्र रंगली आहे.

शेयर करें