Pune News : कात्रज डेअरीला २ कोटी ६० लाखांचा नफा; ३८१ कोटींची उलाढाल
Pune News : पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली आहे.
1 मिनट पठन

Pune News : पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात कात्रज डेअरीने आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये उल्लेखनीय आर्थिक कामगिरी नोंदवली आहे. या वर्षात संघाची सुमारे ३८१ कोटी रुपयांची उलाढाल झाली असून, संघाला २ कोटी ६० लाख रुपयांचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संघाच्या वतीने देण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दूध उत्पादक शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून संघाच्या कामकाजात सातत्याने सुधारणा करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले. कात्रज डेअरीच्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना बाजारात मागणी वाढत असल्याने संघाच्या व्यवसायाला चालना मिळत आहे.
दरम्यान, कात्रज दूध संघाच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे १०० कोटी रुपयांचा अत्याधुनिक दूध प्रकल्प उभारण्याची योजना आखण्यात आली आहे. सध्याचे दूध संकलन दररोज सुमारे दीड लाख लिटर असून ते तीन लाख लिटरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट असल्याचेही जाहीर करण्यात आले आहे. कात्रज डेअरीच्या नफ्यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांना अधिक चांगला परतावा आणि संघाच्या विस्ताराला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
