मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयात १४,४७७ मूर्तींचे विसर्जन ; 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवाची सांगता करताना पुणेकरांनी यंदाही पर्यावरणाचे भान जपल्याचे पाहायला मिळाले.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयात १४,४७७ मूर्तींचे विसर्जन 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद
कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयात १४,४७७ मूर्तींचे विसर्जन 'स्वच्छता ही सेवा' मोहिमेला पुणेकरांचा उदंड प्रतिसाद

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : गणेशोत्सवाची सांगता करताना पुणेकरांनी यंदाही पर्यावरणाचे भान जपल्याचे पाहायला मिळाले. पुणे महानगरपालिकेच्या परिमंडळ क्र. ०५ अंतर्गत कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या दिवशी "पर्यावरणपूरक गणेश विसर्जन" आणि "स्वच्छता ही सेवा २०२६" ही मोहीम यशस्वीपणे राबवण्यात आली. या मोहिमेंतर्गत कसबा पेठ परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल १४,४७७ गणेशमूर्तीचे विसर्जन पर्यावरणपूरक पद्धतीने केले. महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या भागात गणेशमूर्ती विसर्जन आणि संकलनासाठी १८ ठिकाणी अत्यंत नियोजनबद्ध आणि चोख व्यवस्था उभारण्यात आली होती. या व्यवस्थेमुळे भाविकांना सुलभ आणि सुरक्षित वातावरणात आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देणे शक्य झाले.https://maharashtramirror.com/ Pune News

नागरिकांनी नदी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी महापालिकेच्या पर्यायी व्यवस्थांचा मोठ्या प्रमाणात वापर केला. प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार नागरिकांनी पर्यावरणपूरक पर्यायाला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वाधिक ९,९८५ गणेशमूर्तींचे विसर्जन महापालिकेने तयार केलेल्या बांधीव हौदांमध्ये करण्यात आले. ठिकठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेल्या लोखंडी टाक्यांमध्ये ३,९२८ मूर्तींचे विसर्जन पार पडले. तर पालिकेच्या मूर्ती संकलन केंद्रांवर एकूण ५६४ गणेशमूर्ती श्रद्धेने संकलित करण्यात आल्या.घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप आयुक्त संतोष वारुळे, परिमंडळ क्र. ०५ चे उप आयुक्त माधव जगताप, आणि कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त तिमय्या जगले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम यशस्विरित्या पार पडली. https://maharashtramirror.com/ Pune News

त्यांच्यासोबत वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, आरोग्य निरीक्षक चंद्रवदन गायकवाड, नितीन साळुंके, शिवाजी गायकवाड, कृष्णा अवघडे, प्रमोद गायकवाड, संजय तेरेकर, विशाल पाटसकर, अमोल लांडगे, तौसीफ देशपांडे, संतोष गिते या अधिकाऱ्यांसह सर्व अभियंता वर्ग, मोकादम आणि सेवक यांनी प्रत्यक्ष मैदानावर उतरून अहोरात्र परिश्रम घेतले आणि काम नियोजनबद्ध रीतीने पूर्ण केले. संपूर्ण विसर्जन काळात पुणेकर नागरिकांनी उत्कृष्ट शिस्त पाळली आणि पर्यावरणाचे भान राखत महापालिकेच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद दिला. विसर्जन घाट तसेच संकलन केंद्रांवर कार्यरत असलेल्या मनपा कर्मचाऱ्यांना नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. याबद्दल कसबा पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या वतीने सर्व गणेशभक्तांचे आणि नागरिकांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें