Kalyan Crime News : गांजाची तस्करी करणारे तीन जणांना जेरबंद
• पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने सोमवारी विविध भागात कारवाई ; कल्याण, टिटवाळा परिसरात अमली पदार्थ (गांजा) तस्करी करणाऱ्या तिघांना बेड्या
1 मिनट पठन

•पोलीस उपायुक्तांच्या विशेष पथकाने सोमवारी विविध भागात कारवाई ; कल्याण, टिटवाळा परिसरात अमली पदार्थ (गांजा) तस्करी करणाऱ्या तिघांना बेड्या
कल्याण :- पोलीस उप आयुक्त यांच्या विशेष पथकाकडून केलेल्या कारवाईमध्ये कल्याण, टिटवाळा परिसरात गांजाची तस्करी आणि विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे.यामध्ये एका महिलेचा समावेश आहे. त्यांच्याकडून लाखो रूपये किमतीचा दीड किलोहून अधिक किंमतीचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी पोलीस ठाणे हद्दीत सोनावणे टाॅवर समोरील रस्त्यावर मोकळ्या मैदानाजवळून प्रथम तुकाराम गायकवाड (23 वय) याला पोलिसांनी अटक केली आहे. तो कल्याण पूर्वेतील जरीमरी मंदिर रस्ता, तिसगाव भागात राहतो. त्याच्याकडून एक किलोहून अधिक किंमतीचा विक्रीसाठी आणलेला गांजा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरुध्द कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीत कोळीवाडा भागात बकरी मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर गोपाळ गणपत भिडे या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून 370 ग्रॅम वजनाचा गांजा पोलिसांनी जप्त केला आहे. त्याच्यावर बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत आंबिवली बनेली रस्त्यावर शहानवाज हुसेन इराणी (65 वय) या महिलेला पोलिसांनी गांजाची तस्करी करताना अटक केली आहे. तिच्याकडून पोलिसांनी 455 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. ही महिला आंबिवली इराणी वस्तीमध्ये राहते. पोलीस उपायुक्तांचे अंमली पदार्थ विरोधी पथक आणि स्थानिक पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करून या गांजा तस्करांना अटक केली आहे.
हेही वाचा: IPL 2025 : आयपीएल 2025 च्या उर्वरित सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू खेळतील की नाही?
