नारायणगाव बसस्थानकावर १७ लाखांचे दागिने लंपास
नवी मुंबईच्या महिला प्रवाशाला गर्दीचा फायदा घेत लुटले
1 मिनट पठन

नवी मुंबईच्या महिला प्रवाशाला गर्दीचा फायदा घेत लुटले
पुणे: नारायणगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेऊन एका महिला प्रवाशाच्या पर्समधील तब्बल १६ लाख ९४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञाताने लंपास केले आहेत. मंगळवारी (ता. २८) दुपारी सव्वाबारा ते दोनच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी नारायणगाव पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे.

मिरा गणपत शिंदे (वय ४८, सध्या रा. नेरूळ, नवी मुंबई; मूळ रा. बोरी खुर्द साळवाडी, ता. जुन्नर) यांनी यासंदर्भात नारायणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) नुसार गुन्हा नोंदवला आहे.
बसमध्ये चढताना झाली चोरी
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिरा शिंदे या मूळच्या जुन्नर तालुक्यातील असून सध्या नवी मुंबईत राहतात. मंगळवारी दुपारी त्या कामानिमित्त नारायणगाव येथे आल्या होत्या. दुपारी सव्वाबाराच्या सुमारास नारायणगाव बसस्थानकावर बसमध्ये चढत असताना मोठी गर्दी होती. या गर्दीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने मिरा यांच्या खांद्याला अडकवलेल्या पर्सची चेन शिताफीने उघडली आणि त्यातील सोन्याचे दागिने लंपास केले. बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने त्यांना पर्समधील दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.
Jewelry worth 17 lakhs stolen at Narayangaon bus stand
