Jalgone News : जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत गोंधळ! अर्ज बाद झाल्यानंतर आमदाराच्या मुलाचा निवडणूक अधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर राडा
Jalgone News :जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
2 मिनट पठन

Jalgone News :जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद करण्यात आला. यानंतर संतप्त झालेल्या सुमित पाटील यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनाच्या दरवाजावर लाथा मारत आणि हाताने ठोठावत आपला रोष व्यक्त केला. या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेदरम्यान एकच खळबळ उडाली.https://maharashtramirror.com/ Jalgone News
अर्ज बाद झाल्याने सुमित पाटील आक्रमक
जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांच्या अर्जावर भाजपचे सतीश शिंदे यांनी हरकत घेतली होती. या हरकतीनंतर लेखापरीक्षण, संचालक पदाचा कार्यकाळ आणि निवडणुकीतील अन्य निकषांचा विचार करून निवडणूक अधिकाऱ्यांनी त्यांचा अर्ज बाद केला.https://maharashtramirror.com/ Jalgone News
अर्ज बाद झाल्याची माहिती मिळताच सुमित पाटील यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. सकाळी नऊ वाजल्यापासून आपण निवडणूक कार्यालयात उपस्थित असूनही अर्ज बाद केल्याच्या निर्णयाची प्रत देण्यासाठी संबंधित अधिकारी उपलब्ध नसल्याचा आरोप त्यांनी केला.
राजकीय दबावातून अर्ज बाद केल्याचा आरोप
आपला उमेदवारी अर्ज राजकीय दबावातून आणि अदृश्य शक्तींच्या हस्तक्षेपामुळे बाद करण्यात आल्याचा गंभीर आरोप सुमित पाटील यांनी केला. या निर्णयाविरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच संबंधित प्रकरणात कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी या प्रकाराला शिवसेना स्टाइलने उत्तर देण्याचा इशाराही दिला. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील राजकीय संघर्ष अधिक चर्चेत आला आहे.
निवडणूक अधिकाऱ्यांनी काय सांगितले?
दरम्यान, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी विशाल ठाकूर यांनी या प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. सुमित पाटील यांचा उमेदवारी अर्ज निवडणुकीच्या नियमांनुसार आणि निर्धारित निकषांच्या आधारेच बाद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे सतीश शिंदे यांनी दाखल केलेल्या हरकतींची तपासणी केल्यानंतर संबंधित नियमांचा विचार करून निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर?
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील शिवसेना आणि भाजप यांच्यातील मतभेद समोर येत असल्याचे चित्र आहे. सुमित पाटील यांच्या उमेदवारी अर्जावरून निर्माण झालेला वाद आता न्यायालयापर्यंत जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, उमेदवारी अर्ज बाद करण्याच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका सुमित पाटील यांनी घेतल्याने या प्रकरणात पुढे काय घडते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
