मुख्य सामग्री पर जाएँ

Jalandhar News : भारताची जपानवर ४-१ गोलने मात; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग तिसरा विजय

Jalandhar News : जालंधर, महाराष्ट्र मिरर : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ स्पर्धेत जपानचा ४-१ गोलने पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

भारताची जपानवर ४-१ गोलने मात; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग तिसरा विजय
भारताची जपानवर ४-१ गोलने मात; आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीत सलग तिसरा विजय

Jalandhar News : अभिषेक नैनचे दोन गोल; कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि विष्णुकांत सिंगचेही योगदान, भारताची उपांत्य फेरीत धडक

Jalandhar News : जालंधर, महाराष्ट्र मिरर : भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी २०२६ स्पर्धेत जपानचा ४-१ गोलने पराभव करत सलग तिसरा विजय नोंदवला. शुक्रवारी (३० ऑक्टोबर) झालेल्या सामन्यात अभिषेक नैनने दोन गोल करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह गतविजेत्या भारताने उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले.https://maharashtramirror.com/ Jalandhar News

अभिषेक नैनचे दोन गोल


भारताकडून अभिषेक नैनने ११व्या आणि ५१व्या मिनिटाला मैदानी गोल केले. त्याने आपल्या कारकिर्दीतील १५०व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात ही कामगिरी केली. कर्णधार हरमनप्रीत सिंगने ४७व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवर गोल केला, तर विष्णुकांत सिंगने ५६व्या मिनिटाला चौथा गोल नोंदवला.https://maharashtramirror.com/ Jalandhar News

मध्यंतरापर्यंत सामना १-१


भारताने ११व्या मिनिटाला आघाडी घेतली; मात्र जपानच्या शोटा यामादाने १५व्या मिनिटाला पेनल्टी स्ट्रोकवर गोल करत बरोबरी साधली. त्यानंतर जपानने भारतीय आक्रमणाला चांगला प्रतिकार केला. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांची १-१ अशी बरोबरी होती. अंतिम सत्रात भारताने आक्रमणाची धार वाढवली. हरमनप्रीतच्या गोलनंतर अभिषेकने आघाडी वाढवली आणि विष्णुकांतने आणखी एक गोल करत भारताचा विजय निश्चित केला.

भारताची उपांत्य फेरीत धडक


या विजयामुळे भारताने स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकत नऊ गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. यापूर्वी भारताने बांगलादेशचा १३-०, तर चीनचा ५-२ असा पराभव केला होता. भारताचा पुढील सामना रविवारी, १ नोव्हेंबर रोजी मलेशियाविरुद्ध होणार आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें