मुख्य सामग्री पर जाएँ

रावेत येथे घरफोडी करून १५ लाखांच्या दागिन्यासह रोकड चोरी

पिंपरी: राहत्या घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली.

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

रावेत येथे घरफोडी करून १५ लाखांच्या दागिन्यासह रोकड चोरी

पिंपरी: राहत्या घराचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्याने तब्बल १५ लाख २८ हजार रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केली. ही घटना शुक्रवारी (दि. १५) सकाळी पावणेअकरा ते दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान रावेत येथे उघडकीस आली.

याप्रकरणी मनोज अशोक भोंडवे (२५, रा. स्वामी समर्थ सोसायटीजवळ, रावेत) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या घराचा कोयंडा तोडून दरवाजा उघडला. त्यानंतर घरात प्रवेश करून १७८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ७५ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने तसेच एक लाख ४५ हजार रुपयांची रोकड असा एकूण १५ लाख २८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी करून नेला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खिलारे करीत आहेत.

शेयर करें