मुख्य सामग्री पर जाएँ

Harbour MegaBlock News : हार्बर मार्गावर चार दिवसांचा मेगाब्लॉक; रात्री 10.45 नंतर लोकलसेवा ठप्प!

Harbour Train Latest News : वाशी ते पनवेल दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद; प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन

व
विवेक

1 मिनट पठन

Mumbai,Mumbai Local,Mumbai Local Train,Vikhroli Station,Mumbai Local Disrupts,Main Line Suburban Train Services Disrupts,मुंबई,मुंबई लोकल,मुंबई लोकल ट्रेन,विक्रोळी स्थानक,मुख्य मार्गावरील उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत,विक्रोळी स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड

Harbour Train Latest News : वाशी ते पनवेल दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद; प्रवाशांना वेळापत्रक पाहूनच प्रवासाचे नियोजन करण्याचे आवाहन

मुंबई :- हार्बर रेल्वे मार्गाने Harbour Train Update प्रवास करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. मध्य रेल्वेने वाशी रेल्वे स्थानकातील इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंगच्या कामासाठी चार दिवसांचा विशेष ब्लॉक जाहीर केला आहे. हा ब्लॉक आज, मंगळवार, 5 ऑगस्टपासून शुक्रवार, 8 ऑगस्टपर्यंत दररोज रात्री 10.45 ते पहाटे 3.45 या वेळेत घेण्यात येणार आहे. या कालावधीत वाशी ते पनवेल दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद राहणार आहे. Mumbai Local Train Update

या विशेष ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील अनेक लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लोकल गाड्यांच्या वेळा आणि मार्गांमध्येही बदल करण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना काही प्रमाणात गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना प्रवास करण्यापूर्वी अद्ययावत वेळापत्रक तपासून घेण्याचे आवाहन केले आहे.

या लोकल गाड्यांवर परिणाम

1.बेलापूरहून सीएसएमटीकडे जाणारी रात्री 8.54 ची लोकल वाशीपर्यंतच धावेल, तर रात्री 9.16 ची लोकल वडाळा रोडपर्यंतच मर्यादित राहील.

2.पनवेलहून सुटणाऱ्या रात्री 10.55 आणि 11.32 च्या वाशी लोकल आता फक्त नेरूळपर्यंतच चालवण्यात येतील.

3.सकाळच्या वेळेत, वडाळा रोडहून सुटणाऱ्या पहाटे 5.03 आणि 5.52 च्या पनवेल लोकल तसेच सीएसएमटीहून सुटणाऱ्या पहाटे 4.52 आणि 5.30 च्या पनवेल लोकल नेरूळ स्थानकावरून सुरू होतील.

4.वाशी स्थानकातून पहाटे 4.03, 4.15, 4.25, 4.37, 4.50 आणि 5.04 वाजता सुटणाऱ्या अप मार्गावरील लोकल सेवा पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत.

5.त्याचप्रमाणे, सीएसएमटीहून सुटणाऱ्या रात्री 9.50, 10.14 आणि 10.30 च्या डाउन लोकल सेवाही रद्द करण्यात आल्या आहेत.

शेयर करें