दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने तरूणावर जीवघेणा हल्ला
स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
1 मिनट पठन

स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखलhttps://maharashtramirror.com/

पुणे, महाराष्ट्र मिरर प्रतिनिधी : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना गुलटेकडी परिसरात घडली. यामध्ये संबधित तरूण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. राजू शिवलिंगप्पा इकळकी (वय ३५, रा. मिनाताई ठाकरे वसाहत, गुलटेकडी) असे जखमी झालेल्या तरूणाचे नाव आहे. (maharashtra mirror)
प्रेम संजय काळे (वय 2८, रा. डायस प्लॉट, गुलटेकडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. लक्ष्मीबाई शिवलिंगप्पा इकळकी यांनी याबाबत फिर्याद दिली. आरोपी प्रेम काळे याने राजू इकळकी यांना बुधवारी (दि. १२) सकाळी साडेसातच्या सुमारास दारू पिण्यासाठी पैसे मागितले. त्याला पैसे देण्यास इकळकी यांनी नकार दिला. याचा राग मनात धरून प्रेम काळे याने त्यांच्याशी वाद घालत शिवीगाळ केली. वाद वाढल्यानंतर आरोपीने राजू इकळकी यांना हाताने मारहाण केली. त्यानंतर दगडाने त्यांच्या डोक्यात आणि चेहऱ्यावर प्रहार केले. यामध्ये इकळकी गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी रूग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून, सहायक पोलिस निरीक्षक स्वप्नील शेळके पुढील तपास करीत आहेत (maharashtra mirror)
