Gujrat news : गुजरात, सौराष्ट्र-कच्छला जोरदार पावसाचा इशारा
Gujrat news : गुजरात : दक्षिण-पूर्व राजस्थान आणि लगतच्या उत्तर गुजरात परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे.
1 मिनट पठन

Gujrat news : गुजरात : दक्षिण-पूर्व राजस्थान आणि लगतच्या उत्तर गुजरात परिसरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ भागात जोरदार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) दिला आहे.https://maharashtramirror.com/ Gujrat news
दरम्यान, १९ सप्टेंबर २०२६च्या आसपास पश्चिम राजस्थानच्या काही भागांतून नैऋत्य मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास सुरू होण्यासाठी पोषक वातावरण तयार होत असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.https://maharashtramirror.com/ Gujrat news
हवामान विभागाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, दक्षिण-पश्चिम मध्य प्रदेश परिसरात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र पुढे सरकून दक्षिण-पूर्व राजस्थान आणि उत्तर गुजरात परिसरात स्थिरावले आहे. या कमी दाबाच्या क्षेत्राशी संबंधित चक्रीय वाऱ्यांची स्थिती झारखंड, मध्य प्रदेश आणि उत्तर छत्तीसगडपर्यंत विस्तारलेली आहे.
या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे गुजरात, सौराष्ट्र आणि कच्छ भागात आगामी काळात जोरदार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे हवामान विभागाने सूचित केले आहे.
