Pune Crime : सव्वादोन लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला!
Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर: घोरपडे पेठेतील पीएमसी कॉलनीमध्ये अर्धवट उघड्या दरवाजाचा गैरफायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश करून २ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले.
1 मिनट पठन

खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर: घोरपडे पेठेतील पीएमसी कॉलनीमध्ये अर्धवट उघड्या दरवाजाचा गैरफायदा घेत चोरट्याने घरात प्रवेश करून २ लाख २४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune Crime
मिळालेल्या माहितीनुसार, घोरपडे पेठेतील टपाल कार्यालयामागे असलेल्या पीएमसी कॉलनीतील इमारत क्रमांक सात येथे राहणाऱ्या ४६ वर्षीय महिलेने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेच्या राहत्या घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडा होता. दि. २८ रोजी सायंकाळी ५ ते २९ ऑगस्ट सकाळी १० वाजण्याच्या सुमारास चोरट्याने उघड्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेल्या पर्समधून सोन्याचे दागिने लंपास केले. चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर महिलेने तत्काळ पोलिसांत धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक कांबळे तपास करत आहेत.
