मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai News : 'घाटकोपरमध्ये धक्कादायक प्रकार; उद्यानात खेळणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाच्या मानेवर गर्दुल्ल्यांनी टोचले इंजेक्शन!'

Mumbai News :मुंबई :- मुंबईतील घाटकोपर परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

'घाटकोपरमध्ये धक्कादायक प्रकार; उद्यानात खेळणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाच्या मानेवर गर्दुल्ल्यांनी टोचले इंजेक्शन!'
'घाटकोपरमध्ये धक्कादायक प्रकार; उद्यानात खेळणाऱ्या 14 वर्षांच्या मुलाच्या मानेवर गर्दुल्ल्यांनी टोचले इंजेक्शन!'

Mumbai News :'मुक्तानंद रुग्णालयात मुलावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू; बर्वे नगरातील महापालिका शाळा क्र. 3 जवळील उद्यानात गर्दुल्ल्यांचा हैदोस'

Mumbai News :मुंबई :- मुंबईतील घाटकोपर परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि सुरक्षेचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. बर्वे नगर भागातील महापालिकेच्या उद्यानात खेळण्यासाठी गेलेल्या एका 14 वर्षीय शाळकरी मुलाला पकडून काही गर्दुल्ल्यांनी त्याच्या मानेवर थेट सिरिंज (इंजेक्शन) टोचल्याचा थरारक प्रकार घडला आहे. इंजेक्शन टोचल्यानांतर काही वेळातच मुलगा चक्कर येऊन खाली कोसळला असून, त्याला गंभीर अवस्थेत पालिकेच्या मुक्तानंद रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.सदर घटनेमुळे घाटकोपर परिसरातील पालकांमध्ये प्रचंड घबराट पसरली असून घाटकोपर पोलिसांनी या प्रकरणी थेट गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news

'खेळत असताना 3 ते 4 गर्दुल्ल्यांचा हल्ला; मारहाण करून मानेवर टोचले इंजेक्शन'

मिळालेल्या माहितीनुसार, घाटकोपरमधील बर्वे नगर परिसरातील महापालिका शाळा क्रमांक 3 मध्ये शिकणारा यश चौरसिया (वय 14 ) हा सोमवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे आपल्या मित्रांसोबत शाळेजवळील पालिकेच्या उद्यानात खेळण्यासाठी गेला होता.

मुले खेळण्यात मग्न असताना अचानक तेथे 3 ते 4 गर्दुल्ले आले. त्यांनी काहीही न बोलता यशला पकडून बेदम मारहाण केली आणि अचानक त्याच्या मानेवर एक इंजेक्शन टोचले. इंजेक्शन टोचताच यशला तीव्र चक्कर आली आणि तो तसाच जमिनीवर कोसळला. सोबत खेळणाऱ्या लहान मुलांनी तत्काळ पळत जाऊन यशच्या पालकांना ही माहिती दिली. कुटुंबीयांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत यशला घाटकोपर येथील मुक्ताबाई (मुक्तानंद) महापालिका रुग्णालयात नेले. सद्या त्याच्यावर रुग्णालयातील अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत.

'उद्यानात गर्दुल्ल्यांचे अड्डे अन् भंगार गाड्यांचा आसरा; लहान मुलांची सुरक्षा धोक्यात'

घाटकोपरमधील बर्वे नगर परिसरातील या उद्यानात गेल्या अनेक वर्षांपासून अमली पदार्थ सेवन करणाऱ्या गर्दुल्ल्यांचा वावर प्रचंड वाढला आहे. उद्यानाचा बाहेरील परिसर निर्जन असल्याने तेथे उभ्या असलेल्या भंगार वाहनांचा वापर गर्दुल्ले आपले अड्डे बनवण्यासाठी करत आहेत.

बाजूलाच महापालिकेची शाळा असल्याने लहान मुले दररोज या परिसरात येत असतात. मात्र, या गर्दुल्ल्यांच्या मोकाट वावरामुळे लहान मुलांच्या जिवाला मोठा धोका निर्माण झाला असून, पालकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पोलीस प्रशासनाने या भागातील सर्व गर्दुल्ल्यांवर तात्काळ कठोर कारवाई करावी आणि संबंधित आरोपींना लवकरात लवकर बेड्या ठोकाव्यात, अशी तीव्र मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com/

शेयर करें