Pune News : गणेशोत्सवाच्या गर्दीत पीएमपीला उच्चांकी २ कोटी ६७ लाखांचे उत्पन्न
Pune News : पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) सोमवारी विक्रमी दैनंदिन उत्पन्नाची नोंद केली.
1 मिनट पठन

Pune News : पुणे : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपीएमएल) सोमवारी विक्रमी दैनंदिन उत्पन्नाची नोंद केली. पीएमपीएमएलला सोमवारी तब्बल २ कोटी ६७ लाख ११ हजार ९७६ रुपयांचे उत्पन्न मिळाले. गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाल्याने पीएमपीएमएलने सकाळपासून रात्री उशिरापर्यंत बससेवा सुरू ठेवली होती. या विशेष सेवेचा नागरिकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घेतला.https://maharashtramirror.com/ Pune News
गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन सोमवारी शहराच्या विविध मार्गांवर तब्बल १ हजार ८३२ बस धावल्या. यामध्ये पीएमपीएमएलच्या ५४२ बस, तर भाडेतत्त्वावरील १ हजार २९० बस होत्या. रात्री उशिरापर्यंत बससेवा उपलब्ध करून दिल्याने गणेशभक्तांना विविध गणपती मंडळांचे देखावे पाहण्यासाठी मोठी सुविधा झाली.दरम्यान, तिकीट न काढता प्रवास करणाऱ्या प्रवाशांवरही पीएमपीएमएलकडून कारवाई करण्यात आली. या कारवाईत हेडक्वार्टर क्रमांक १ कडून ४८ हजार रुपये, तर हेडक्वार्टर क्रमांक २ कडून ३५ हजार रुपये दंड वसूल करण्यात आला. https://maharashtramirror.com/ Pune News
सोमवारी पीएमपीएमएलला तिकीट विक्रीतून १ कोटी ८४ लाख ४१ हजार ७२४ रुपये उत्पन्न मिळाले. तसेच दैनंदिन पासमधून ४८ लाख ३० हजार ५०० रुपये, पुणे दर्शन व पर्यटन सेवेतून सुमारे १४ हजार ५०० रुपये, तर मोबाईल अॅपद्वारे तिकीट विक्रीतून ३४ लाख २५ हजार २५२ रुपये उत्पन्न मिळाले. गणेशोत्सवाच्या काळात प्रवाशांना सुरळीत आणि सुरक्षित वाहतूक सेवा देण्यासाठी पीएमपीएमएलचे अधिकारी, डेपो व्यवस्थापक, चालक, वाहक आणि इतर कर्मचाऱ्यांनी विशेष प्रयत्न केले. त्यांच्या या कामगिरीबद्दल प्रशासनाकडून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करण्यात आले.
