मुख्य सामग्री पर जाएँ

Ganesh: संकष्टी चतुर्थीनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरात भाविकांची मांदियाळी

पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा

स्मिता कुलकर्णी
स्मिता कुलकर्णी

1 मिनट पठन

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती
श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती

Ganesh पुणे, महाराष्ट्र मिरर : पुणे आणि महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. गणरायाच्या दर्शनासाठी पहाटे तीन वाजल्यापासूनच भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी केली होती. पहाटेपासून दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या असून, 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला होता.

संकष्टी चतुर्थीनिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेकाने धार्मिक विधींना सुरुवात झाली. त्यानंतर पहाटे ४ ते दुपारी ४ वाजेपर्यंत महाअभिषेक आयोजित करण्यात आला होता. तसेच सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत गणेशयाग पार पडला.

या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासह गणरायाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. संकष्टीच्या निमित्ताने मंदिरात दिवसभर भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळाले.

शेयर करें
स्मिता कुलकर्णी

रिपोर्टर-सबएडिटर

महाराष्ट्र मिरर