Pune crime : जेष्ठ महिलेवर सुनेसह नातेवाईकांचा हल्ला
Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर : एका ज्येष्ठ महिलेवर तिच्या सुनेने आणि नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना गहुंजेतील लोढा बेलमोंडो येथे घडली.
1 मिनट पठन

Pune Crime : शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
Pune Crime पुणे, महाराष्ट्र मिरर : एका ज्येष्ठ महिलेवर तिच्या सुनेने आणि नातेवाईकांनी जीवघेणा हल्ला केल्याची घटना गहुंजेतील लोढा बेलमोंडो येथे घडली. याप्रकरणी शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला. याप्रकरणी ६८ वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सून आणि तिच्या आई, वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pune crime
फिर्यादी यांच्या सुनेने आणि तिच्या वडिलांनी नोकराच्या बेडरूममध्ये जाऊन फिर्यादीला धक्का दिला. तिथे त्यांचा विनयभंग केला. दुसऱ्या आरोपीने फिर्यादीचे हात पकडले, तर सुनेने गळा दाबून धारदार वस्तूने गळ्यावर दुखापत करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तसेच फिर्यादीच्या पती आणि मुलाला मारहाण करून शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शिरगाव पोलिस तपास करत आहेत.
