Delhi News : फॉर्म-६ मधील अतिरिक्त घोषणेवरून SIR वाद चिघळला; जयराम रमेश यांचे निवडणूक आयोगावर आरोप
Delhi News : नवी दिल्ली - देशात विशेष मतदार यादी पुनरिक्षण अर्थात (एसआयआर ) वरून निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमधील वाद कायम आहे.
1 मिनट पठन

Delhi News : नवी दिल्ली - देशात विशेष मतदार यादी पुनरिक्षण अर्थात (एसआयआर ) वरून निवडणूक आयोग आणि विरोधी पक्षांमधील वाद कायम आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि निवडणूक आयोगावर फॉर्म-६ संदर्भात गंभीर आरोप केले आहेत. रमेश यांच्या म्हणण्यानुसार, प्रथमच मतदान करणाऱ्या तरुणांच्या नोंदणीसाठी वापरल्या जाणाऱ्या ऑनलाइन फॉर्म-६ सोबत एसआयआरशी संबंधित अतिरिक्त घोषणा जोडण्यात आली आहे. या घोषणेत अर्जदाराचे नाव मागील एसआयआरमतदार यादीत होते का, तसेच त्याच्या आई-वडिलांचे किंवा आजी-आजोबांचे नाव त्या यादीत होते का, अशी माहिती मागितली जाते. त्यामुळे नव्या मतदारांच्या नोंदणी प्रक्रियेत अनावश्यक अडथळे निर्माण होऊ शकतात, असा दावा रमेश यांनी केला आहे. https://maharashtramirror.com/ Delhi News
आज १८ वर्षांचे होणाऱ्या अनेक तरुणांचा जन्म मागील एसआयआरच्या वेळी झालेला नसल्याने, त्यांच्याकडून पालक किंवा आजी-आजोबांची माहिती मागणे योग्य आहे का, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. https://maharashtramirror.com/ Delhi News
मात्र, निवडणूक आयोगाने फॉर्म-6 मध्ये कोणताही बदल केल्याचा आरोप फेटाळला आहे. आयोगाच्या म्हणण्यानुसार, मूळ फॉर्म-6 मध्ये बदल करण्यात आलेला नसून SIR प्रक्रियेसाठी त्यासोबत स्वतंत्र अॅनेक्सर डी (Annexure D) जोडण्यात आला आहे. आयोगाने २४ जून २०२५ रोजी जारी केलेल्या एसआयआर मार्गदर्शक सूचनांचा हवाला देत ही अतिरिक्त घोषणा आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे.
रमेश यांनी मात्र आयोगाला अशी अतिरिक्त माहिती मागण्याचा स्वतंत्र अधिकार नसल्याचा दावा केला आहे. संबंधित कायदेशीर प्रक्रिया पाळणे आवश्यक असल्याचे सांगत त्यांनी ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच त्यांच्या राजीनाम्याची आणि जबाबदारी निश्चित करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
