Mumbai news : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणावर 15 दिवसांनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे मौन सुटले; निष्पक्ष चौकशीचे आणि कठोर कारवाईचे आदेश!
Mumbai news : ठाणे :- ठाण्यातील मानपाडा भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या 29 सप्टेंबर रोजी झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणी तब्बल 15 दिवसांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे.
1 मिनट पठन

Mumbai news : कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही; ठाण्याच्या मानपाड्यातील हत्याकांडानंतर पालकमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी प्रतिक्रिया
Mumbai news : ठाणे :- ठाण्यातील मानपाडा भागात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या 29 सप्टेंबर रोजी झालेल्या निर्घृण हत्या प्रकरणी तब्बल 15 दिवसांनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिल्यांदाच जाहीर भाष्य केले आहे. प्रदीप पूर्णेकर यांची हत्या अत्यंत दुर्दैवी असल्याचे स्पष्ट करत, पोलीस आयुक्तांना या प्रकरणाच्या निष्पक्ष चौकशीचे काटेकोर आदेश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणात कोणत्याही दोषी व्यक्तीला किंवा मारेकऱ्याला पाठीशी घातले जाणार नाही आणि आरोपींवर अत्यंत कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.https://maharashtramirror.com/ Mumbai news
आरोपींच्या पोलीस कोठडीत वाढ; हत्येतील शस्त्रांचा व कटाचा कसून शोध सुरू
या बहुचर्चित हत्या प्रकरणात पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने वाढ केली असून कसून चौकशी सुरू आहे.
सुभाष उर्फ पप्या शिंदे याला 13 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
संतोष उर्फ टल्ली आणि अमित सिंग यांना 19 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
पोलिसांच्या दाव्यानुसार हत्येसाठी दोन पिस्तुले आणि तीन चॉपर वापरण्यात आले होते, त्यापैकी आतापर्यंत केवळ एकच पिस्तूल हस्तगत करण्यात आले असून रक्ताळलेले कपडे व शस्त्रांचा शोध घेतला जात आहे. तसेच आरोपींना आर्थिक पाठबळ पुरवणारे, शस्त्रांची व्यवस्था करणारे आणि त्यांना फरार होण्यासाठी मदत करणाऱ्या सहकाऱ्यांचा शोधही पोलीस पथकाकडून घेतला जात आहे.
नेमके प्रकरण काय होते?
ठाण्यातील मानपाडा परिसरातील कार्यालयात 29 सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास पाच हल्लेखोरांनी घुसून प्रदीप (बाळा) पूर्णेकर यांच्यावर पिस्तुलमधून सात राऊंड फायर केले होते, त्यापैकी चार गोळ्या त्यांच्या शरीरात शिरल्या. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पूर्णेकर यांना तात्काळ रुग्णालयात नेले असता उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित करण्यात आले. या प्रकरणात मृताच्या कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मिनाक्षी शिंदे आणि त्यांच्या पतीवर हत्येचा कट रचल्याचा गंभीर आरोप केला आहे.
