मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime News : खराबवाडी परिसरात रस्त्यावर गांजा विकणारे दोन तस्कर जेरबंद

सव्वा लाखापेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त

म
मुबारक

1 मिनट पठन

सव्वा लाखापेक्षा जास्त किमतीचा गांजा जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर : खराबवाडी गावाच्या हद्दीत रस्त्यावर उभे राहून नागरिकांना अंमली पदार्थांची विक्री करणाऱ्या दोन तस्करांना पोलिसांनी सव्वा लाखापेक्षा जास्त किमतीच्या गांजासह अटक केली आहे. ही कारवाई गुरुवारी (१८ जून) पहाटे १.३० वाजण्याच्या सुमारास सारासिटीच्या पुढे रोडवर करण्यात आली.

याप्रकरणी दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राजेश वसंत गिरी यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार मनोज जगदीश पांजगे (२१, रा. खराबवाडी, मूळ रा. वडगाव मंठा, जालना) आणि रईस सरवर तडवी (२५, रा. खराबवाडी) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनोज पांजगे हा लोकांमध्ये विक्री करण्यासाठी एकूण १ लाख ७१ हजार रुपये किमतीचा ३ किलो ४२० ग्रॅम वजनाचा गांजा बेकायदेशीरपणे जवळ बाळगून उभा होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने सदर गांजा दुसरा आरोपी रईस तडवी याच्याकडून घेतल्याचे सांगितले, त्यानंतर पोलिसांनी रईसलाही बेड्या ठोकल्या.

दक्षिण महाळुंगे पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Drug Peddlers

शेयर करें