मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : दिवाळीच्या गोडव्यावर महागाईचे सावट; सुकामेव्याचे दर १० टक्क्यांनी वाढले काजू, बदाम, पिस्ता महागले; दुष्काळाचा फटका, मागणीही घटली

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : दिवाळी म्हटले की फराळ, मिठाई आणि सुकामेव्याच्या खरेदीची लगबग सुरू होते.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

दिवाळीच्या गोडव्यावर महागाईचे सावट; सुकामेव्याचे दर १० टक्क्यांनी वाढले काजू, बदाम, पिस्ता महागले; दुष्काळाचा फटका, मागणीही घटली
दिवाळीच्या गोडव्यावर महागाईचे सावट; सुकामेव्याचे दर १० टक्क्यांनी वाढले काजू, बदाम, पिस्ता महागले; दुष्काळाचा फटका, मागणीही घटली

Pune News :पुणे, महाराष्ट्र मिरर : दिवाळी म्हटले की फराळ, मिठाई आणि सुकामेव्याच्या खरेदीची लगबग सुरू होते. नातेवाइकांना ड्रायफ्रूट्सचे आकर्षक गिफ्ट बॉक्स देण्याचीही परंपरा आहे. मात्र, यंदा दिवाळीच्या आनंदावर महागाईचे सावट आले आहे. काजू, बदाम, पिस्ता यांसारख्या सुकामेव्याच्या दरात गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. आधीच वाढलेल्या महागाईमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना आता सुकामेवा खरेदी करतानाही खिशाचा विचार करावा लागत आहे. परिणामी, फराळासाठी सुकामेवा घेण्याचे प्रमाण आणि दिवाळीच्या गिफ्ट पॅक्सची मागणीही कमी झाली आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दुष्काळाचा परिणाम, आयात शुल्कातील वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातून मालाची आवक होण्यास होणारा विलंब यामुळे सुकामेव्याचे दर वाढल्याचे चित्र आहे. घाऊक बाजारातही यंदा मागणी अपेक्षेपेक्षा कमी आहे. विशेषतः गिफ्ट पॅक्सच्या खरेदीला तुलनेने कमी प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून मागणीत वाढ होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.https://maharashtramirror.com/ Pune News

परदेशातून होते सुकामेव्याची आवक


अमेरिकेतील कॅलिफोर्नियातून बदाम आणि अक्रोड, सौदी अरेबिया, इराक, इराण आणि अफगाणिस्तानातून पिस्ता, खजूर व खारीक, तर तुर्कस्तानातून अंजीर आयात केले जाते. व्हिएतनाममधून काजूची आवक होते.

सुकामेव्याचे घाऊक दर (प्रतिकिलो रुपये)

सुकामेवा आधीचे दर सध्याचे दर
काजू ८०० ते १२०० ९०० ते १३००
बदाम ७०० ते ९०० १००० ते ११००
पिस्ता १४०० ते १८०० १८०० ते २२००
अक्रोड १२०० ते १३०० १२०० ते १४००
मनुका ४०० ते ६०० ४०० ते ६००
जर्दाळू ४०० ते ६०० ४०० ते ६००

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें