मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : दिवाळीच्या सजावटीसाठी ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला

Pune News : पुणे : दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांकडून ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली जात आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

दिवाळीच्या सजावटीसाठी ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला पणत्या, आकाशकंदील, विद्युत दिव्यांच्या माळांसह सजावटीच्या साहित्याला पसंती
दिवाळीच्या सजावटीसाठी ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड वाढला पणत्या, आकाशकंदील, विद्युत दिव्यांच्या माळांसह सजावटीच्या साहित्याला पसंती

Pune News : पणत्या आकाशकंदील, विद्युत दिव्यांच्या माळांसह सजावटीच्या साहित्याला पसंती

Pune News : पुणे : दिवाळीनिमित्त घराची सजावट करण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांकडून ऑनलाइन शॉपिंगला पसंती दिली जात आहे. पणत्या, मातीचे दिवे, विद्युत दिव्यांच्या माळा, स्टँडिंग दिवे, हँगिंग दिवे आणि आकाशकंदील यांसारख्या वस्तू ऑनलाइन खरेदी करण्याचा ट्रेंड वाढताना दिसत आहे.https://maharashtramirror.com/ Pune News
दिवाळीच्या काळात घराच्या सजावटीला विशेष महत्त्व असते. त्यासाठी रांगोळीचे रंग, रांगोळीचे साचे, आकर्षक तोरणे, दारावरील सजावटीचे स्टिकर्स, फुलांच्या माळा, मेणबत्त्या आणि विविध सजावटीच्या वस्तू खरेदी केल्या जातात. या वस्तूंचे विविध प्रकार, रंग आणि डिझाइन ऑनलाइन उपलब्ध असल्याने ग्राहकांना घरबसल्या खरेदी करणे सोयीचे ठरत आहे.
नोकरी आणि व्यवसायामुळे महिलांना तसेच तरुणींना खरेदीसाठी पुरेसा वेळ मिळत नाही. त्यातच दिवाळीच्या काळात बाजारपेठांमध्ये होणारी गर्दी आणि शहरातील वाहतूक कोंडी यामुळे खरेदीसाठी बाहेर पडणे वेळखाऊ ठरते. त्यामुळे मोबाइलवरून वस्तूंची निवड करणे, किमतींची तुलना करणे आणि घरपोच वस्तू मागविणे हा पर्याय अनेकांना सोयीचा वाटत आहे.
दिवाळी जवळ आल्याने शेवटच्या क्षणी होणारी धावपळ टाळण्यासाठी नागरिकांकडून सजावटीच्या साहित्याची खरेदी आधीच केली जात आहे. त्यामुळे पारंपरिक बाजारपेठांसोबतच ऑनलाइन शॉपिंगलाही दिवाळीच्या खरेदीत महत्त्व प्राप्त झाले आहे.़
“नोकरी आणि घरातील कामांमुळे दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात जाण्यास वेळ मिळत नाही. तसेच बाजारपेठांमधील गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आम्ही ऑनलाइन शॉपिंगला प्राधान्य देतो. पणत्या, आकाशकंदील, दिव्यांच्या माळा आणि सजावटीच्या वस्तू घरबसल्या निवडता येत असल्याने वेळेची बचत होते.” वैष्णवी मोरे, ग्राहक.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें