मुख्य सामग्री पर जाएँ

Pune News : धनकवडीत बंद फ्लॅट फोडून चोरी; अज्ञात चोरट्याकडून ३ लाख ८० हजारांचे दागिने लंपास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धनकवडी परिसरातील पुण्याईनगर येथे बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

धनकवडीत बंद फ्लॅट फोडून चोरी; अज्ञात चोरट्याकडून ३ लाख ८० हजारांचे दागिने लंपास
धनकवडीत बंद फ्लॅट फोडून चोरी; अज्ञात चोरट्याकडून ३ लाख ८० हजारांचे दागिने लंपास

Pune News : पुणे, महाराष्ट्र मिरर : धनकवडी परिसरातील पुण्याईनगर येथे बंद फ्लॅटचे कुलूप उचकटून घरात प्रवेश केलेल्या अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. या चोरीत ३ लाख ८० हजार रुपयांचे दागिने चोरीला गेले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune News
ही घटना ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी दुपारी साडेतीन ते पावणेपाच वाजण्याच्या दरम्यान घडली. केके मार्केटसमोर, धनेश्वर मंदिरामागील लेन क्रमांक दोनमधील कावेरी बिल्डिंग, फ्लॅट क्र. ६, पुण्याईनगर, धनकवडी येथे हा प्रकार घडला..https://maharashtramirror.com/ Pune News
या प्रकरणी ५६ वर्षीय महिलेने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, भारतीय न्याय संहिता कलम ३०५ आणि ३३१(३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा फ्लॅट कुलूप लावून बंद असताना अज्ञात व्यक्तीने कशाच्या तरी साहाय्याने दरवाजाचे कुलूप उचकटले. त्यानंतर घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने चोरून नेले.
अज्ञात आरोपीचा शोध सुरू असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप खंडागळे करीत आहेत.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें