मुख्य सामग्री पर जाएँ

Mumbai news : सलमान खान, रोहित शेट्टी, टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनांनी मुंबईत खळबळ; मुख्यमंत्री फडणवीसांचा गुन्हेगारी टोळ्यांना सज्जड दम

Mumbai news :मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

सलमान खान, रोहित शेट्टी, टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनांनी मुंबईत खळबळ; मुख्यमंत्री फडणवीसांचा गुन्हेगारी टोळ्यांना सज्जड दम
सलमान खान, रोहित शेट्टी, टायगर श्रॉफवरील गोळीबाराच्या घटनांनी मुंबईत खळबळ; मुख्यमंत्री फडणवीसांचा गुन्हेगारी टोळ्यांना सज्जड दम

Mumbai news :मुंबई : बॉलिवूड अभिनेता सलमान खान, दिग्दर्शक रोहित शेट्टी आणि अभिनेता टायगर श्रॉफ यांच्याशी संबंधित गोळीबाराच्या घटनांमुळे मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या घटनांची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हेगारी टोळ्यांना कडक इशारा दिला आहे. परदेशात लपून बसलेले गुन्हेगार भाडोत्री व्यक्तींच्या माध्यमातून टोळ्या चालवत असल्याचे सांगत, अशा गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना लवकरच कायद्याच्या कचाट्यात आणले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.https://maharashtramirror.com/ Mumbai news

आरोपींची ओळख पटली; पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे


या प्रकरणांतील संशयित आरोपींची ओळख पटली असून, पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे लागले असल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. संबंधित गुन्हेगारांचा शोध घेण्यासोबतच या घटनांमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत आणि त्यांना कोणाचे पाठबळ आहे, याचाही पर्दाफाश केला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीही अशाच प्रकारची घटना घडली असताना पोलिसांनी तपासाच्या माध्यमातून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्यात यश मिळवले होते. त्याच धर्तीवर यावेळीही पोलिसांकडून कारवाई केली जाईल, असे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.

गुन्हेगारी कृत्ये खपवून घेणार नाही : फडणवीस


मुंबईत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांना कोणत्याही परिस्थितीत मोकळे सोडले जाणार नाही. या घटनांमागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा ठाम इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

दरम्यान, बॉलिवूडमधील कलाकारांशी संबंधित गोळीबाराच्या घटनांमुळे शहरातील सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला असून, या प्रकरणांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

ताज्या घडामोडी आणि महत्वपूर्ण बातम्यांसाठी वाचा महाराष्ट्र मिरर ई पेपर https://epaper.maharashtramirror.com

शेयर करें