Delhi news : डिलिमिटेशन विधेयकावरून पंतप्रधान मोदींचे सूचक ट्वीट; महिला आरक्षणावर ठाम भूमिका मांडत विरोधकांवर निशाणा
Delhi news :जुन्या भाषणाचा व्हिडीओ पोस्ट करत मोदींचा हल्लाबोल; विशेष अधिवेशनापूर्वी राजकीय वातावरण तापले
2 मिनट पठन

Delhi news : नवी दिल्ली :- मतदारसंघ पुनर्रचना (डिलिमिटेशन) आणि महिला आरक्षण विधेयकाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर एक सूचक ट्वीट करत विरोधकांवर निशाणा साधला आहे. विशेष अधिवेशनाच्या तोंडावर त्यांनी आपल्या जुन्या भाषणाचा एक भाग शेअर करत महिला आरक्षणाप्रती आपली कटिबद्धता अधोरेखित केली आहे.
जुन्या भाषणातील व्हिडीओ शेअर करत विरोधकांवर टीका
मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स (ट्विटर) हँडलवरून एक छोटासा व्हिडीओ पोस्ट केला आहे. यापूर्वी मतदारसंघ पुनर्रचना व महिला आरक्षणाशी संबंधित विधेयक सभागृहात मंजूर होऊ शकले नसल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशाला संबोधित केले होते. त्या भाषणातील अंश पोस्ट करत मोदींनी काँग्रेससह विरोधकांवर कडक शब्दांत टीका केली होती. “आमचा विश्वास अढळ आहे. देशातील समस्त नारीशक्ती आमच्या पाठीशी आहे. नारीशक्तीला भागिदारी देण्याची लढाई गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे. अनेक महिलांनी आरक्षणाचा हा मुद्दा माझ्यापुढे मांडलेला आहे”, असे मोदी या व्हिडीओत बोलताना दिसत आहेत.
विशेष अधिवेशनापूर्वी राजकीय हालचालींना वेग
30 नोव्हेंबरपासून संसदेचे विशेष अधिवेशन सुरू होत असताना, सुधारित डिलिमिटेशन आणि महिला आरक्षण विधेयकावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष सुरू आहे. यापूर्वी लोकसभेत व राज्यसभेत आवश्यक संख्याबळाअभावी या विधेयकावरून पेच निर्माण झाला होता. आता विशेष अधिवेशनापूर्वी पंतप्रधानांनी जुना व्हिडीओ पुढे करत नारीशक्तीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळत असून, यावरून आगामी संसदीय कामकाजात राजकीय वाद आणखी चिघळण्याची चिन्हे आहेत.
https://epaper.maharashtramirror.com/

hey, i am vikrant kulkarni news and video editor of maharashtra mirror news paper

