Pimpri Crime : देहूगाव येथे पत्नीचा खून करून पतीचा आत्महत्येचा प्रयत्न
Pimpri Crime पिंपरी: देहूगाव येथे रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला.
1 मिनट पठन

Pimpri Crime : शेती घ्यायला विरोध केल्याने गरोदर पत्नीला केले ठार
Pimpri Crime पिंपरी: देहूगाव येथे रविवारी (२० सप्टेंबर) पहाटे पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. त्यानंतर पतीने स्वतःवर वार करून दुसऱ्या मजल्यावरून रस्त्यावर उडी मारली. या घटनेचे कारण समोर आले आहे. पत्नीने गावी शेती घेण्यासाठी विरोध केल्याने तिची हत्या करण्यात आली आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri Crime
शुभांगी आकाश बारस्कर (२८, रा. देहूगाव) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी सतीश मारुती काईत (५६, रा. सांगली) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार आरोपी पती आकाश रामदास बारसकर (३१, रा. देहूगाव, मूळ- जामखेड, अहिल्यानगर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.https://maharashtramirror.com/ Pimpri crime
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची मुलगी शुभांगी हिने पती आकाश याला गावी शेतजमीन घेण्यास विरोध केला होता. याचा राग मनात धरून आकाश हा तिच्याशी सतत भांडण करत असे. शुभांगी तीन महिन्यांची गरोदर होती. आकाश याने तिची काळजी न घेता तिच्याशी भांडण केले. रविवारी पहाटे त्या दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. त्याने शुभांगी यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांचा खून केला. त्यानंतर आकाश याने स्वतःवर देखील वार करून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. तसेच इमारतीच्या दुसऱ्या मजल्याच्या गॅलरी मधून खाली उडी मारली. तो या घटनेत गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
