Pune crime : देहू कॅन्टोन्मेंटच्या लष्करी प्रतिबंधित क्षेत्रात घुसून चंदनाच्या झाडाची चोरी
Pune crime : पिंपरी: देहू कॅम्प येथील भारतीय सैन्याच्या '१२६ लाईट एडी रेजिमेंट सेंटर'च्या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे प्रवेश करून १० हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाचे खोड चोरणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी पसार झाले आहेत.
1 मिनट पठन

Pune Crime : झाडाचे खोड चोरणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला अटक
Pune crime : पिंपरी: देहू कॅम्प येथील भारतीय सैन्याच्या '१२६ लाईट एडी रेजिमेंट सेंटर'च्या प्रतिबंधित क्षेत्रात बेकायदेशीरपणे प्रवेश करून १० हजार रुपये किमतीच्या चंदनाच्या झाडाचे खोड चोरणाऱ्या तिघांपैकी एका आरोपीला पोलिसांनी अटक केली असून दोन आरोपी पसार झाले आहेत.https://maharashtramirror.com/ Pune crime
लष्करी हद्दीत घुसखोरी
नाईक सुभेदार मोनेश्वर पोहेश्वर सोनुवाल (वय ४२, रा. देहू कॅम्प) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, ९ सप्टेंबर रोजी पहाटे १.१४ वाजेच्या सुमारास आरोपींनी गार्डन सिटी, १२६ लाईट एडी रेजिमेंट सेंटर परिसरातील तारेचे कुंपण कापून नुकसान केले. भारतीय सैन्याच्या या प्रतिबंधित क्षेत्रात अनाधिकृतरीत्या प्रवेश करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सुमारे १०,००० रुपये किमतीच्या चंदनाच्या वृक्षाचे खोड तोडून पळवून नेले.https://maharashtramirror.com/ Pune crime
कारवाई व आरोपींची माहिती
या प्रकरणी देहूरोड पोलिसांनी रवींद्र बुवाजी मधे (वय २६, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याला अटक केली आहे. तर त्याचे साथीदार अविनाश मधे (वय २५, रा. अकोले, जि. अहिल्यानगर) व गोविंद कडाळे (वय ३०, रा. ता. जुन्नर) हे दोघे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०३(२), ३२९(३), ३२४(३), ३(५) अन्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरीक्षक जाधव तपास करत आहेत.
