मुख्य सामग्री पर जाएँ

Pune Crime : दौंड परिसरातील दोन अट्टल सोनसाखळी चोरांना अटक

Pune Crime: पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे धडक कारवाई करत दोन सराईत सोनसाखळी चोरांना जेरबंद केले आहे.

वक
विक्रांत कुलकर्णी

1 मिनट पठन

दौंड परिसरातील दोन अट्टल सोनसाखळी चोरांना अटक
दौंड परिसरातील दोन अट्टल सोनसाखळी चोरांना अटक

Pune Crime : सहा गुन्हे उघडकीस; ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत

Pune Crime: पुणे: पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि दौंड पोलीस स्टेशनच्या पथकाने संयुक्तपणे धडक कारवाई करत दोन सराईत सोनसाखळी चोरांना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे दौंड, यवत, वडगाव निंबाळकर आणि जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील एकूण ६ गंभीर गुन्हे उघडकीस आले आहेत.https://maharashtramirror.com/

पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बापुसाहेब धडस यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. दौंड पोलीस स्टेशन हद्दीत घडलेल्या जबरी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक गिल यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या कडक सूचना दिल्या होत्या.

त्यानुसार तपास पथकाने गुन्ह्यांची वेळ, ठिकाण आणि कार्यपद्धतीचा सखोल आढावा घेतला. या माहितीचे विश्लेषण करून आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारावर पोलिसांनी दीपक बलभीम पवार (वय २८, रा. ता. जामखेड, जि. अहिल्यानगर) आणि युवराज सचिन लोखंडे (वय २४, रा. ता. इंदापूर, जि. पुणे) या दोघांना जामखेड परिसरातून ताब्यात घेतले.

पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी पुढीलप्रमाणे गुन्हे केल्याची कबुली दिली: दौंड पोलीस स्टेशन: २ गुन्हे, यवत पोलीस स्टेशन: २ गुन्हे, वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन: १ गुन्हा, जेजुरी पोलीस स्टेशन: १ गुन्हा.

आरोपींकडून एकूण ९ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, यामध्ये ५५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एका मोटर सायकलचा समावेश आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर आणि दौंड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांच्यासह पथकातील अंमलदारांनी या कारवाईत सहभाग घेतला. या प्रकरणाचा पुढील तपास दौंड पोलीस करीत आहेत.

शेयर करें