मुख्य सामग्री पर जाएँ

Cyber Crimeपुण्यात सायबर चोरट्यांचा उच्छाद

पुणे, महाराष्ट्र मिरर Cyber Crime : पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सायबर भामटे, वाहन तोडफोड करणाऱ्या टोळ्या आणि अट्टल चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

Cyber Crimeपुण्यात सायबर चोरट्यांचा उच्छाद

एका दिवसात साडेतीन कोटी लुटले; प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक लक्ष्य

पुणे, महाराष्ट्र मिरर Cyber Crime : पुणे शहर आणि उपनगरांमध्ये सायबर भामटे, वाहन तोडफोड करणाऱ्या टोळ्या आणि अट्टल चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या चोवीस तासात शहराच्या विविध भागात गंभीर गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामध्ये विशेषत: साडेतीन कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाली आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करण्यात आले आहे. याशिवाय अल्पवयीन मुलांकडूनही करण्यात आलेल्या विविध गुन्ह्यांची नोंद झाली आहे. यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.Cyber Crime

ज्येष्ठ नागरिकांना घालण्यात आलेला ऑनलाईन गंडा, अल्पवयीन मुलांकडू धारदार हत्यारांसह गाड्यांची तोडफोड, पालखी सोहळ्यात धाडसी चोरी आणि एका हिट अँड रन अपघातात नागरिकाचा मृत्यू झाल्याच्या घटनांनी पुणे शहर हादरले आहे. विशेषत सायबरच्या गुन्ह्यामध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.यामध्येही ज्येष्ठ नागरिकांना मोठ्या प्रमाणावर लक्ष्य करण्यात आल्याचे दिसून येत आहे.Cyber Crime

ट्रेडिंग फ्रॉड : मोबाईल आणि बँक खातेधारकांनी अधिक परताव्याचे आमिष दाखवून आनंदनगर येथील एका व्यक्तीची ५२ लाख रुपयांची फसवणूक केली. फेसबुक ट्रेडिंग स्कॅम : फेसबुकवर लिंक पाठवून ट्रेडिंगच्या नावाखाली येरवडा येथील एका ७३ वर्षीय वृद्ध महिलेला ५५ लाख ४३ हजार रुपयांचा गंडा घातला. पॉलिसी बोनस स्कॅम : आयआरडीए (IRDA) आणि आरबीआय (RBI) अधिकारी बनून वडगाव शेरी येथील पॉलिसीचा बोनस देण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीची ६८ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केली. फ्रोड डिजिटल अरेस्ट : एटीएस (ATS) आणि सीआयडी (CID) अधिकारी बनून कम्पमधील एका ८४ वर्षीय वृद्धाला डिजिटल अरेस्टची धमकी देत ५० लाख ५० हजार रुपये उकळले. फॉरेक्स ट्रेडिंग स्कॅम : यूट्यूबवरील जाहिरातीद्वारे संपर्क साधून फॉरेक्स आणि क्रिप्टो ट्रेडिंगच्या नावाखाली जंगली महाराज रस्त्यावरील. ८० वर्षीय वृद्धाची ४६ लाख ८७ हजार रुपयांची लूट केली. ईमेल हॅकिंग : पौड रोड येथील एका ६७ वर्षीय महिलेच्या बँक खात्याला लिंक असलेला ईमेल आयडी बदलून खात्यातून ३३ लाख ३१ हजार रुपये परस्पर ट्रान्सफर केले.

Cyber Crime

शेयर करें