मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : पुण्यात तरुणावर फायरींग, चौघे ताब्यात

पूर्वीच्या वादाचा वचपा; ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी तीन जण अल्पवयीन

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

CRIME NEWS : पुण्यात तरुणावर फायरींग, चौघे ताब्यात

पूर्वीच्या वादाचा वचपा; ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी तीन जण अल्पवयीन

पुणे CRIME NEWS: पुण्यातील सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची धक्कादायक घटना घडली आहे. १० जून रोजी रात्री सुमारे १० ते १०.३० वाजण्याच्या दरम्यान योगेश बनेकर यांच्यावर चार गोळ्या झाडण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या हल्ल्यात त्यांचा जीव वाचला असून एक गोळी त्यांच्या मानेला घासून गेल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.CRIME NEWS

प्राथमिक माहितीनुसार, उर्वरित तीन गोळ्या हवेत झाडण्यात आल्या. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.CRIME NEWS

या प्रकरणाची माहिती मिळताच सहकारनगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि ११ जूनच्या पहाटे ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास चार जणांना ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींपैकी तीन जण अल्पवयीन असून एक आरोपी सज्ञान असल्याची माहिती समोर आली आहे. सर्व आरोपी पुण्यातील पर्वती परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, सुमारे दीड महिन्यांपूर्वी वाहन चालवण्याच्या कारणावरून योगेश बनेकर आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. त्याच वादाचा राग मनात ठेवून हा हल्ला करण्यात आल्याची कबुली आरोपींनी प्राथमिक चौकशीत दिल्याचे समजते.CRIME NEWS

दरम्यान, या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून गोळीबाराचा नेमका उद्देश, शस्त्राचा स्रोत आणि इतर कोणाचा सहभाग होता का, याचा तपास सुरू आहे. पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.

CRIME NEWS

शेयर करें