मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : यवत पोलिसांनी उघडकीस आणला टपाल खात्यातील दीड लाखांचा अपहार

कानगाव पोस्टाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

CRIME NEWS : यवत पोलिसांनी उघडकीस आणला टपाल खात्यातील दीड लाखांचा अपहार

कानगाव पोस्टाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कानगाव येथील डाक विभागाच्या (टपाल कार्यालयाच्या) खात्यामधील तब्बल १ लाख ५० हजार रुपयांची शासकीय रक्कम स्वतःच्या खाजगी कामासाठी वापरून सरकारी निधीचा अपहार केल्याचा आणि टपाल खातेदारांची आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.CRIME NEWS

या अपहारप्रकरणी वरिष्ठ टपाल अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी कायदेशीर कारवाई सुरू केली असून या कारवाईमुळे दौंड तालुक्यासह टपाल विभागाच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

या गंभीर घटनेप्रकरणी डाक विभागाचे अधिकारी शशिकांत परमानंद सिंह (४५, रा. केडगाव, ता. दौंड, जि. पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित आरोपी अजित नामदेव राऊत (रा. कडेठाण, ता. दौंड, जि. पुणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ४०८ आणि ४०९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा आर्थिक अपहाराचा गैरप्रकार ८ मार्च २०२६ ते २२ मे २०२६ च्या दरम्यान मौजे कानगाव (ता. दौंड) येथील टपाल कार्यालयाच्या हद्दीत घडला असून, बुधवारी (१७ जून) यवत पोलिसांत या गुन्ह्याची अधिकृत नोंद करण्यात आली आहे.

फिर्यादी शशिकांत सिंह हे टपाल विभागात जबाबदार पदावर कार्यरत असून त्यांच्याकडे संबंधित भागातील टपाल कार्यालयांच्या निरीक्षणाची जबाबदारी आहे. कानगाव येथील टपाल कार्यालयामध्ये आर्थिक व्यवहारांची नियमित तपासणी व लेखापरीक्षण (ऑडिट) करत असताना, त्यांना शासकीय जमा रक्कमेमध्ये मोठी तफावत आढळून आली. तसेच आरोपी अजित राऊत याने टपाल कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजातील आणि खातेदारांनी जमा केलेली एकूण १ लाख ५० हजार रुपयांची शासकीय खात्यात जमा न करता स्वतःच्या वैयक्तिक व खाजगी कामासाठी वापरल्याचे समोर आले. हा गंभीर गैरव्यवहार उघड झाल्यानंतर शशिकांत सिंह यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.CRIME NEWS

या प्रकरणाचा पुढील तपास यवत पोलीस ठाण्याचे साहाय्यक फौजदार फणसे करत असून, आरोपीने आणखी खातेदारांची अशी फसवणूक केली आहे का, यादृष्टीने पोलीस तपास करत आहेत.

CRIME NEWS

शेयर करें