मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : 'झोपेतून उठवून बहिणीशी भांडण करतो काय, तुला जिवंत सोडणार नाही'

मेव्हण्याकडून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

CRIME NEWS : 'झोपेतून उठवून बहिणीशी भांडण करतो काय, तुला जिवंत सोडणार नाही'

मेव्हण्याकडून तरुणावर चाकूने जीवघेणा हल्ला

पिंपरी CRIME NEWS: 'झोपेतून उठवून बहिणीशी भांडण करतो काय', असे म्हणत एका इसमाने आपल्या साथीदारांसह त्याच्या तरुण मेव्हण्यावर चाकू आणि काठीने जीवघेणा हल्ला केला. ही घटना शनिवारी (२७ जून) पहाटे ४ वाजताच्या सुमारास नेरे येथे घडली.CRIME NEWS

या प्रकरणात रोहित तानाजी शेंडगे (३४, रा. नेरे) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार विपुल संजय जानकर (२४, रा. सांगली) आणि त्याच्यासोबत अन्य तीन व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

फिर्यादी हे घरी झोपलेले असताना, त्यांचा मेव्हणा विपुल याने त्यांना झोपेतुन उठवून "माझ्या बहिणीशी भांडण करतो काय, तुला जिवंत सोडणार नाही" असे बोलून हातातील चाकूने फिर्यादीच्या उजव्या हाताच्या पंजावर आणि पार्श्वभागावर वार केले. त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या इसमाने तोच चाकू घेऊन फिर्यादीच्या दोन्ही पायांवर वार केले. तसेच अन्य दोघांनी प्लास्टिकच्या काठीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून फिर्यादीस जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

CRIME NEWS

शेयर करें