CRIME NEWS :अल्पवयीन मुलाकडून गावठी बनावटीचे पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त
भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई
1 मिनट पठन

भारती विद्यापीठ पोलिसांची धडक कारवाई
पुणे CRIME NEWS : भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनच्या पथकाने एका मोठ्या गुन्ह्याला पायबंद घालत एका विधिसंघर्षित बालकाला बेकायदेशीर अग्निशस्त्रासह ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून ५०,००० रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल आणि १०० रुपये किमतीची दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.CRIME NEWS

याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे सापळा रचून कारवाई
भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तपास अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व त्यांचे पथक दिनांक ५ मे २०२६ रोजी हद्दीत पेट्रोलींग करत होते. यावेळी पोलीस अंमलदार मितेश चोरमले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना एक अल्पवयीन मुलगा घातक अग्निशस्त्रासह कात्रज हायवेवरील त्रिमूर्ती गार्डनसमोरील 'झाशीची राणी भुयारी मार्गाजवळ' (आंबेगाव बुद्रुक) येथे थांबलेला असल्याची गोपनीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस अंमलदारांच्या पथकाने तातडीने त्रिमुर्ती गार्डन परिसरातील भुयारी मार्गाजवळ जाऊन शोध घेतला. तेथे संशयास्पदरित्या थांबलेल्या एका विधिसंघर्षित बालकाची झडती घेतली असता, त्याच्याकडे एक गावठी बनावटीचे पिस्टल व २ जिवंत काडतुसे असा अंदाजे ५०,१०० रु. किमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त करून त्या मुलाला ताब्यात घेतले आहे.CRIME NEWS
आर्म ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ३७ (१), (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी हे करत आहेत.CRIME NEWS
पोलीस उपायुक्त (परिमंडळ मिलिंद मोहिते, सहाय्यक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाने आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) कैलास कोडग यांच्या सूचनेनुसार पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरमले, सागर बोरगे, अभिनय चौधरी, सचिन सरपाले, अवधुत जमदाडे, महेश बारवरकर, मंगेश पवार, निलेश खैरमाडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार आणि संदिप आगळे यांच्या पथकाने केली.
CRIME NEWS
