मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : गणेश पेठ परिसरातील शाहीर बिल्डिंगमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, चोरट्याने रोख रक्कमेसह इतर एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

CRIME NEWS : घरफोडीत पावणेदोन लाखांचा ऐवज लंपास

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : गणेश पेठ परिसरातील शाहीर बिल्डिंगमध्ये पहाटेच्या सुमारास घरफोडीची घटना घडली असून, चोरट्याने रोख रक्कमेसह इतर एकूण १ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ जून रोजी पहाटे फिर्यादी यांच्या घराची उघडी असलेल्या खिडकीतून चोरट्याने आत प्रवेश केला. त्यानंतर कपाटाच्या लॉकरमधील ८० हजार रुपयांची रोख रक्कम, सोन्याची चैन तसेच कपाटाजवळ ठेवलेले दोन मोबाईल फोन असा एकूण १ लाख ६८ हजार रूपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

CRIME NEWS

शेयर करें