CRIME NEWS : खडकीत दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला; दोघांना अटक
"हप्ता का दिला नाही" अशी विचारणा करत फिर्यादी व मित्रावर केले वार
1 मिनट पठन

"हप्ता का दिला नाही" अशी विचारणा करत फिर्यादी व मित्रावर केले वार
पुणे CRIME NEWS: खडकी परिसरात हप्ता न दिल्याच्या कारणावरून दोन तरुणांवर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याप्रकरणी खडकी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते.

खडकी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४० वर्षीय फिर्यादी हे आपल्या मित्रासोबत ७ जून २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास रेंज हिल्स परिसरातील छोट्या बोगद्याजवळ थांबले होते. त्यावेळी आरोपींनी "हप्ता का दिला नाही" अशी विचारणा करत फिर्यादी व त्यांच्या मित्रावर धारदार शस्त्राने वारंवार वार करून त्यांचा खून करण्याचा प्रयत्न केला.CRIME NEWS
या प्रकरणात निहाल मिलिंद गवळी (वय २०, रा. खडकी) आणि पृथ्वी बनगर पवार उर्फ नानू (वय २०, रा. खडकी) यांना अटक करण्यात आली आहे. आणखी एक अज्ञात आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.CRIME NEWS
घटनेत आरोपींनी परिसरात दहशत निर्माण करण्याचाही प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गाडीलकर करीत आहेत.
CRIME NEWS
