CRIME NEWS : दुकान भाड्याने घेतल्याच्या रागातून व्यापाऱ्याला मारहाण
शिवीगाळ करत व्यवसाय करू न देण्याची आरोपीने दिली धमकी
1 मिनट पठन

शिवीगाळ करत व्यवसाय करू न देण्याची आरोपीने दिली धमकी
पिंपरी CRIME NEWS: दुकान भाड्याने घेतल्याच्या कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करून, त्याची सोन्याची साखळी हिसकावून नेल्याची घटना कासारवाडी येथील नाशिक फाटा परिसरात घडली. या प्रकरणी दोघांवर दापोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून, रिषभसिंह संतोषकुमार सिंग (वय २७, रा. तळवडे), लवकुश हरीगेन सिंग (वय २६, रा. बिजलीनगर, चिंचवड) या आरोपींना अटक करण्यात आली आहे.CRIME NEWS

या प्रकरणी प्रविण शर्मा (रा. पुनावळे, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सदरची घटना रविवारी (७ जून) रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास घडली. कासारवाडी येथील नाशिक फाटा परिसरातील गेरा इम्पिरियम गेट वेजवळील एक दुकान फिर्यादी यांनी भाड्याने घेतल्याचा राग आरोपींच्या मनात होता. या रागातून आरोपींनी फिर्यादीला मारहाण करत त्यांच्या गळ्यातील दोन लाख २५ हजार रुपये किमतीची सोन्याची चैन हिसकावून नेली. तसेच त्यांच्या पत्नीलाही शिवीगाळ करत व्यवसाय करू देणार नाही, अशीही धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
CRIME NEWS
