मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : पिंपळे गुरव येथे प्रॉपर्टीच्या वादातून गळा चिरून हत्या

प्रॉपर्टीच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

CRIME NEWS : पिंपळे गुरव येथे प्रॉपर्टीच्या वादातून गळा चिरून हत्या

प्रॉपर्टीच्या कारणावरून झालेल्या वादाचे पर्यवसान

पिंपरी, CRIME NEWS: पिंपळे गुरव मधील लक्ष्मीनगर येथे प्रॉपर्टीच्या कारणावरून झालेल्या वादातून एका व्यक्तीची दगडी पाटा डोक्यात मारून आणि कोयत्याने गळा चिरून हत्या करण्यात आली. ही घटना रविवारी (२८ जून) रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.CRIME NEWS

कन्नन बालकृष्ण पडाची असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणात श्रेणी पोलीस उपनिरीक्षक विजय शेलार यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सेल्वराज राजंगम (५२, रा. पिंपळे गुरव) या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला सेल्वराज आणि कन्नन पडाची यांच्यामध्ये प्रॉपर्टीच्या कारणावरून वाद झाला होता. या वादातून आरोपीने कन्नन यांच्या डोक्यात दगडी पाटा मारला. त्यानंतर कोयत्याने मानेवर वार केले. गळा चिरून त्यांना जीवे ठार मारले. पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत.CRIME NEWS

शेयर करें