मुख्य सामग्री पर जाएँ

Crime News : शेतीचे साहित्य चोरणारे तिघे अटकेत; पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप, सौर मोटार पंप, केबल वायर आदी साहित्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढ झाली होती.

वज
विदुला जगदाळे

1 मिनट पठन

Crime News : शेतीचे साहित्य चोरणारे तिघे अटकेत; पंचवीस लाखांचा मुद्देमाल जप्त

वालचंदनगर पोलिसांची कारवाई

पुणे, महाराष्ट्र मिरर Crime News : गेल्या काही दिवसांपासून शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर, ट्रॉली, पिकअप, सौर मोटार पंप, केबल वायर आदी साहित्यांच्या चोरीच्या घटनांमध्ये पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात वाढ झाली होती. या गुन्ह्याचा छडा लावत वालचंदनगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून, सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी वालचंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. Crime News

जयदीप नानासो घोळवे (वय २२), मेघराज नानासो आंबोसे (वय २२), आकाश विलास शिंदे (वय २३, तिघे रा. निंबोडी, ता. इंदापूर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, वरिल तिघांनी लाकडी, शिंदेवाडी व भवानीनगर परिसरातील शेतकऱ्यांच्या ट्रॉली व इतर साहित्यांची चोरी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी भवानीनगर परिसरातून दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली. त्यानंतर तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून एक न्यू हॉलंड कंपनीचा ट्रॅक्टर, एक ट्रॉली, एक महिंद्रा पिकअप, एक सौर मोटार पंप तसेच चोरीसाठी वापरण्यात आलेला ट्रॅक्टर असा एकूण सुमारे पंचवीस लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.Crime News

ही कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक राजकुमार डुणगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने केली.Crime News

जप्त मुद्देमाल शेतकऱ्यांना परत

पिकअप चोरीच्या आणखी काही घटनांचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. सर्व जप्त मुद्देमाल संबंधित फिर्यादी आणि शेतकऱ्यांना परत देण्याची प्रक्रिया सुरू आहे.Crime News

Crime News

शेयर करें