मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : रावेत येथे स्पा चालकाला ब्लॅकमेल करून उकळली खंडणी

आरटीआय कार्यकर्ता, महिलेसह चौघांवर गुन्हा

पघ
प्रशिक घस्ते

1 मिनट पठन

CRIME NEWS : रावेत येथे स्पा चालकाला ब्लॅकमेल करून उकळली खंडणी

आरटीआय कार्यकर्ता, महिलेसह चौघांवर गुन्हा

पिंपरी CRIME NEWS: परवानाधारक स्पा सेंटरमध्ये बेकायदेशीरपणे घुसून महिला कर्मचार्‍यांचे व्हिडिओ चित्रीकरण करत ५० हजार रुपयांची खंडणी मागणार्‍या एका हायप्रोफाइल टोळीचा रावेत पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.CRIME NEWS

प्रसिद्धीच्या झोतात असलेला एक कथित माहिती अधिकार कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्तीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

आरटीआय कार्यकर्ता विष्णू सुरवसे, कथित महिला सामाजिक कार्यकर्ती स्वाती गायकवाड आणि त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत स्पा चालक दीपक कोल्हापूरकर (वय ३८, रा. म्हाळूंगे) यांनी रावेत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.CRIME NEWS

'तुमच्या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालतो'
फिर्यादी यांचे रावेत येथील मस्के वस्तीत अधिकृत स्पा व मसाज सेंटर आहे. २३ मे रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास सामाजिक कार्यकर्ती गायकवाड हिच्यासह तिचे तीन साथीदार स्पामध्ये जबरदस्तीने घुसले. 'तुमच्या स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालतो', असा आरोप करत, कोणतीही परवानगी न घेता तिथल्या महिला कर्मचार्‍यांचे व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली.

व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची आणि धंदा बंद पाडण्याची धमकी देत या टोळीने ५० हजार रुपयांची मागणी केली. भीतीपोटी फिर्यादीने तात्काळ ५ हजार रुपये रोख दिले. उर्वरित ४५ हजार रुपयांसाठी विष्णू सुरवसे याने फोनवरून व आरोपींनी प्रत्यक्ष भेटून सातत्याने धमक्या दिल्या.CRIME NEWS

ग्राहकालाही या टोळीने ब्लॅकमेल केले
धक्कादायक बाब म्हणजे स्पामध्ये आलेल्या एका ग्राहकालाही या टोळीने ब्लॅकमेल करून ५ हजार रुपयांची मागणी केली व ५०० रुपये ऑनलाइन उकळले. रावेत पोलीस तपास करीत आहेत.

CRIME NEWS

शेयर करें