CRIME NEWS : चिंचवड येथे शाळेला लागून देशी दारूची विक्री
१०० दारूच्या बाटल्या जप्त
1 मिनट पठन

१०० दारूच्या बाटल्या जप्त
पिंपरी CRIME NEWS : थरमॅक्स चौक, चिंचवड येथील ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कुलच्या पाठीमागे एक व्यक्ती देशी दारूची विक्री करत होता. याप्रकरणी पोलिसांनी त्यास अटक केली आहे. ही कारवाई ३ जून रोजी सायंकाळी आठ वाजता करण्यात आली.

मेघराज विठ्ठल पाटील (४०, आकुर्डी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस कॉन्स्टेबल उद्धव खेडकर यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.CRIME NEWS
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्ञानभक्ती इंटरनॅशनल स्कुलच्या पाठीमागील बाजूला शाळेच्या भिंतीला लागून मेघराज पाटील हा देशी दारूची विक्री करत होता. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या दारू अड्ड्यावर कारवाई केली. या कारवाई मध्ये पोलिसांनी १०० दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. निगडी पोलीस तपास करीत आहेत.CRIME NEWS
CRIME NEWS
