CRIME NEWS : एम-परिवहन ॲप डाऊनलोड करायला लावून लूट
आळंदी येथील व्यक्तीची ४ लाख ७६ हजारांची फसवणूक
1 मिनट पठन

आळंदी येथील व्यक्तीची ४ लाख ७६ हजारांची फसवणूक
पिंपरी CRIME NEWS : मोबाईलवर 'एम-परिवहन' चे खोटे मेसेज पाठवून आणि मोबाईलचा अनधिकृत ॲक्सेस मिळवून एका व्यक्तीची ४ लाख ७६ हजार रुपयांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यात आली. ही घटना शुक्रवारी (५ जून) दुपारी वडगाव रोड, आळंदी येथे घडली. या प्रकरणात एका ५१ वर्षीय व्यक्तीने आळंदी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.CRIME NEWS

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे घरी असताना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर व्हॉट्सॲपवर एम-परिवहनचा एक मेसेज आला. त्यात फिर्यादीच्या दुचाकी वाहनावर १००० रुपयांचा दंड असल्याचे भासविण्यात आले होते. फिर्यादीने दंड पाहण्यासाठी दिलेल्या 'वीव चलन' या ऑप्शनवर क्लिक केले असता, एक ॲप डाऊनलोड झाले आणि ते स्क्रीनवरून दिसेनासे झाले.CRIME NEWS
त्यानंतर अज्ञात आरोपीने फिर्यादीच्या मोबाईलचा अनाधिकृतपणे ॲक्सेस घेऊन कॉल फॉरवर्ड केले. यानंतर फिर्यादीच्या फ्लिपकार्ट अकाउंटवरून त्यांच्या क्रेडिट कार्डचा वापर करून ४ लाख ७६ हजार ४४ रुपये किमतीचे सॅमसंग कंपनीचे चार मोबाईल ऑर्डर करून त्यांची आर्थिक फसवणूक केली. आळंदी पोलीस तपास करत आहेत.
CRIME NEWS
