मुख्य सामग्री पर जाएँ

CRIME NEWS : नसरापूर प्रकरणी ऐतिहासिक निकालांचा आधार

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS : नसरापूर येथील चिमुरडीवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावताना न्यायालयाने कायदेशीर अचूकता आणि स्थापित न्यायनियमांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाच्या जवळपास बारा महत्त्वाच्या ऐतिहासिक निकालांचा संदर्भ दिला.

पघ
प्रशिक घस्ते

2 मिनट पठन

CRIME NEWS : नसरापूर प्रकरणी ऐतिहासिक निकालांचा आधार

पुणे, महाराष्ट्र मिरर, CRIME NEWS: नसरापूर येथील चिमुरडीवरील बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे याला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावताना न्यायालयाने कायदेशीर अचूकता आणि स्थापित न्यायनियमांचा आधार घेत सर्वोच्च न्यायालयाच्या जवळपास बारा महत्त्वाच्या ऐतिहासिक निकालांचा संदर्भ दिला. हा गुन्हा ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ स्वरूपाचा असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने मृत्यूदंड योग्य ठरवला.CRIME NEWS

पीडित शेवटची आरोपीसोबत दिसल्यानंतर त्यानंतर काय घडले याचा समाधानकारक खुलासा करण्याची जबाबदारी आरोपीवर असल्याचे स्पष्ट केले होते. भीमराव कांबळेने सीसीटीव्ही फुटेजमध्ये दुपारी ३.१२ ते ३.५१ या कालावधीत चिमुरडीसोबत दिसत असूनही त्याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नसल्याने त्याच्यावरील परिस्थितीजन्य पुरावे अधिक भक्कम झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकालात नमूद केले.CRIME NEWS

या निकालांचा देण्यात आला संदर्भ

न्यायालयाने विशेषतः बचन सिंग विरुद्ध पंजाब राज्य या ऐतिहासिक निकालाचा आधार घेतला. या निकालात सर्वोच्च न्यायालयाने मृत्यूदंडासाठी ‘दुर्मिळातील दुर्मिळ’ हा सिद्धांत निश्चित केला होता. गुन्ह्याची अमानुषता, समाजावर होणारा परिणाम आणि आरोपीच्या सुधारणेची अत्यंत कमी किंवा शून्य शक्यता हे निकष या प्रकरणात पूर्णपणे लागू होत असल्याचे न्यायालयाने नमूद केले.CRIME NEWS

शंकर खाडे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या प्रकरणाचा उल्लेख करत न्यायालयाने मृत्यूदंडासाठी निश्चित करण्यात आलेले पाच प्रमुख निकषही लागू असल्याचे सांगितले. गुन्ह्याचे अत्यंत क्रूर स्वरूप, समाजमन हादरवणारे कृत्य, आरोपीमध्ये सुधारणेची शून्य शक्यता, असहाय पीडित आणि कोणत्याही उकसावणीशिवाय केलेला गुन्हा हे सर्व निकष भीमराव कांबळेच्या प्रकरणात पूर्णपणे सिद्ध झाल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले.CRIME NEWS

याशिवाय उत्तर प्रदेश राज्य विरुद्ध सतीश, सुशील मुर्मू विरुद्ध झारखंड राज्य, धनंजय चटर्जी विरुद्ध पश्चिम बंगाल राज्य आणि वसंत दुपारे विरुद्ध महाराष्ट्र राज्य या बालकांवरील बलात्कार व खून प्रकरणांतील सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांचाही आधार घेण्यात आला. या सर्व प्रकरणांमध्ये गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन मृत्यूदंड कायम ठेवण्यात आला होता.
शंभूभाई फडिया विरुद्ध गुजरात राज्य या निकालाचाही न्यायालयाने विशेष उल्लेख केला.CRIME NEWS

प्रशासनाच्या सन्मानार्थ आभार फेरी

आरोपी भीमराव कांबळे याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर संपूर्ण नसरापूर गावात समाधानाची भावना व्यक्त करण्यात आली. या ऐतिहासिक निकालाबद्दल न्यायव्यवस्था, पोलीस प्रशासन तसेच शासनाचे आभार मानण्यासाठी अखिल गाव नसरापूर, व्यापारी असोसिएशन, पत्रकार संघटना आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी सायंकाळी शांततेत भव्य आभार फेरी व कॅण्डल मार्च काढण्यात आला. यावेळी ग्रामस्थांनी भावना व्यक्त करताना सांगितले की, एक तारखेला बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनेचा निकाल आज वटपौर्णिमेच्या दिवशी लागणे हा एक भावनिक योगायोग आहे. या निर्णयामुळे संपूर्ण गावाला न्याय मिळाल्याची भावना निर्माण झाली असून, “नरकापूर” अशी ओळख निर्माण झालेल्या नसरापूरची प्रतिमा आता पुन्हा सन्मानाने उभी राहिली आहे.

CRIME NEWS

शेयर करें